महाराष्ट्र

अतिवृष्टी नुकसानभरपाईसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; अवकाळी पावसाची भरपाई जानेवारीपासून रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टर १०,०००ची अतिरिक्त मदत..

अतिवृष्टी नुकसानभरपाईसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; अवकाळी पावसाची भरपाई जानेवारीपासून रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टर १०,०००ची अतिरिक्त मदत..

नागपूर (प्रतिनिधी):- महाराष्ट्र विधानसभेत आज मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी राज्यातील अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि पुरबाधित शेतकऱ्यांसाठी मदत वितरणाबाबत सविस्तर माहिती दिली. खरीप व रब्बी हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानाला लक्षात घेऊन राज्य सरकारने यंदा तब्बल २०,००० कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Oplus_16908288

खरीप हंगामातील नुकसानभरपाईत ९० लाख शेतकऱ्यांना ७,१५६ कोटी रुपये वितरित.

रब्बी हंगामात ८५.७८ लाख शेतकऱ्यांना ६,८६४ कोटी रुपये देण्यात आले.

एकूण १४,००० कोटी रुपये DBT द्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा.

ऑक्टोबर महिन्यात विशेषतः कोकणात झालेल्या अवकाळी पावसाची नुकसानभरपाई अद्याप सुरू नसून, जानेवारी २०२६ पासून ही रक्कम वितरित करण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

एनडीआरएफ निकषांनुसार मिळणाऱ्या नियमित मदतीसोबतच, राज्य सरकारने शेतकऱ्यांना अतिरिक्त सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्य निर्णयांसह ,रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टर १०,००० अतिरिक्त मदत.

पावसामुळे जमीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ४७,००० रुपये नियमित मदत .

याशिवाय मनरेगाअंतर्गत प्रति हेक्टर ३ लाख रुपये देण्याचा निर्णय.

ई-केवायसीमुळे मदत वितरणात होणारा विलंब टाळण्यासाठी राज्य सरकारने Agri-Stack Farmer ID स्वीकारला आहे. ७५% पेक्षा जास्त शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित कार्य जलदगतीने सुरू आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!