Prabuddha Raj

Latest Marathi News

महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूरात भव्य रक्तदान शिबिर ‘परिवर्तन समूह’चा मानवतेचा संदेश

सोलापूर (प्रतिनिधी):- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण आणि समाजपरिवर्तनातील महान योगदानाला कृतज्ञतापूर्वक सलाम म्हणून परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्था, सोलापूर तर्फे यंदा विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजसेवा व मानवतेच्या मूलभूत मूल्यांना वाहिलेल्या या दिवशी संस्था भव्य रक्तदान शिबिर आयोजित करत आहे.

हे रक्तदान शिबिर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय रक्तपेढी (सिव्हिल हॉस्पिटल), सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडणार आहे.

शिबिराची माहिती
दिनांक: ६ डिसेंबर २०२५
वेळ: सकाळी ८.०० ते सायंकाळी ८.००
स्थळ: हुतात्मा स्मृती मंदिर पार्किंग परिसर, सोलापूर
संयुक्त विद्यमान: छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय रक्तपेढी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, बंधुता आणि मानवता यांचे मूल्य समाजात रुजवले. त्यांच्या कार्याचा सन्मान राखत आणि समाजासाठी काहीतरी करण्याच्या भावनेने “रक्तदान ही मानवतेची खरी सेवा” या संदेशातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आजच्या आधुनिक वैद्यकीय उपचारामध्ये रक्ताची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची बनली आहे. त्यामुळे या शिबिरातून जमा होणारे रक्त अनेक गरजू रुग्णांचे जीवन वाचवू शकते, हा यामागचा मुख्य हेतू आहे.

संस्थेच्या सचिव अमृता अकलुजकर म्हणाल्या, “बाबासाहेबांनी दिलेली शिकवण प्रत्येकाला समाजकार्यात सहभागी होण्याची प्रेरणा देते. त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदानासारखा दिव्य उपक्रम राबवण्याचा आम्हाला अभिमान आहे.”
त्या पुढे म्हणाल्या,“नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे आणि समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे.”

रक्तदान करणाऱ्या व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांना भविष्यात गरज भासल्यास मोफत रक्त मिळण्याची सुविधा रक्तदात्यांना प्रमाणपत्र व अल्पोपहार,डॉक्टर व प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती

या उपक्रमासाठी एचडीएफसी बँक स्पॉन्सर म्हणून सहकार्य करत आहे.
उपस्थित मान्यवर
अमृता अकलुजकर,संस्थापक सचिव,जगदीश बिडकर,खजिनदार,भारत अकलुजकर ,सभासद
📞 संपर्क
9763260860 / 9075260860 / 7798939399

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी – रक्तदानातून मानवता जपूया, समाजासाठी पुढे येऊया.