सोलापूर (प्रतिनिधी) :- शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सोशल मीडियाच्या माध्यमातून योग्य न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने संघर्ष करणारे औज (ता. दक्षिण सोलापूर) येथील गिरमला धर्मण्णा गुरव यांची शेतकरी संघटना – सोशल मीडिया सोलापूर जिल्हा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.
दि. ०१ डिसेंबर २०२५ रोजी संघटनेतर्फे देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात त्यांच्या — सोशल मीडियावरील प्रभावी कामगिरीची समाजातील सर्व घटकांशी असलेल्या जवळिकीची,शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर असलेल्या संवेदनशीलतेची ,संघटनात्मक बांधिलकीची दखल घेऊन ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा. शिवाजीराव नांदखिले आणि राष्ट्रीय नेतृत्व मा. रघुनाथदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची बाजू बळकट करून शासनापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी गुरव यांच्यावर देण्यात आली आहे.
संघटनेच्या विविध न्यायिक,राजकीय, संवैधानिक व जनहिताच्या आंदोलनांना सोशल मीडियावरून योग्य प्रसिद्धी देऊन जनजागरण करण्याचे आवाहनही नियुक्तीपत्रात करण्यात आले आहे.
या निवडीबद्दल जिल्ह्यातील शेतकरी ,सामाजिक संघटना व विविध कार्यकर्त्यांकडून गुरव यांचे अभिनंदन सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पत्रकार संघा तर्फे गिरमला गुरव यांचा सत्कार करून नव्या जबाबदारीस शुभेच्छा देण्यात आल्या.
“शेतकरी हा देशाचा कणा आहे. शेतकऱ्यांचा आवाज मोठा आणि ताकदवान बनवणे हेच पुढील काळात माझे प्राथमिक काम असेल,” असा निर्धार गिरमला गुरव यांनी व्यक्त केला.

More Stories
बे-कायदा शौचालय पाडण्याच्या प्रकारणी नागेश कोरे यांच्यावर गुन्हा दाखल
महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूरात भव्य रक्तदान शिबिर ‘परिवर्तन समूह’चा मानवतेचा संदेश
पुल्ली कन्या प्रशालेत क्रीडा सप्ताह उत्साहात साजरा