सोलापूर (प्रतिनिधी) :- महाराष्ट्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येत असून ५ डिसेंबर रोजी राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनाचे आयोजन महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ, तसेच विविध शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :
शिक्षक पात्रता परीक्षा (TET) सक्तीचा निर्णय रद्द करणे
संच-मान्यता संदर्भातील शासन निर्णय मागे घेणे
प्रलंबित सेवा बाबींचे निराकरण
रिक्त पदे तात्काळ भरणे
वेतन व सेवा लाभांची अंमलबजावणी राज्यभर शाळा बंद ठेवण्यात येणार असून सर्व जिल्ह्यांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.

पुण्यात झालेल्या महासभेत मुख्याध्यापक महामंडळाने हा निर्णय जाहीर केला. या बैठकीनंतर राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची घोषणा करण्यात आली असून शिक्षक संघटनांनी सरकारला तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
मुख्याध्यापक संघ महामंडळ आणि शिक्षक संघटनांच्या म्हणण्यानुसार, शासनाने वारंवार निवेदन देऊनही मागण्यांकडे दुर्लक्ष केले असून, शिक्षकांचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असल्याने आता तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही.
५ डिसेंबर रोजी राज्यातील सर्व सार्वजनिक, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित शाळा बंद राहणार असल्याने विद्यार्थी व पालकांनी शाळेची उपस्थिती टाळावी, अशी आवाहन संघटनांकडून करण्यात आले आहे.
सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर राज्यभर संप तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. पुढील आंदोलनाची दिशा आगामी बैठकीत निश्चित केली जाणार आहे.

More Stories
“भांडवलशाही नव्हे, मानवी प्रतिष्ठेला केंद्रस्थानी ठेवणारी अर्थव्यवस्था ही डॉ. आंबेडकरांची देणगी”- प्रा.एम.आर. कांबळे
इंदू मिल स्मारकाचे 50% काम पूर्ण; पुढील महापरिनिर्वाण दिनी लोकार्पण – मुख्यमंत्री फडणवीसांचा आत्मविश्वास
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित मुंबईतील महत्त्वाची स्थळे