सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने, राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. प्राप्त हरकतींची पडताळणी व निवारण प्रक्रिया सध्या महानगरपालिका स्तरावर प्राधान्याने सुरू असून त्यासाठी प्रभागनिहाय विशेष पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत.
या संपूर्ण प्रक्रियेचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त मा. श्री. सचिन ओम्बासे यांनी दिनांक 02 डिसेंबर 2025 रोजी शहरातील विविध प्रभागांना भेट देत प्रारूप मतदार यादीवरील हरकतींची स्थळवस्तुस्थिती तपासली. त्यांनी प्रभाग क्र. 8, 9, 11 आणि 12 मधील जोडबसवण्णा चौक, रविवार पेठ, कर्णीक नगर, एकतानगर, अक्कलकोट रोड, मल्लिकार्जुन नगर या भागात स्वतः भेट देऊन सर्वेक्षण पथकाकडून कामाची माहिती घेतली.

प्रभाग हरकतदार हरकतीचा विषय सर्वेक्षणानुसार निष्कर्ष
प्रभाग 8 व 9 – रविवार पेठ श्री. इंजापुरे व श्री. येमुल मतदार नोंदीतील त्रुटी हरकत योग्य आढळली
प्रभाग 12 → प्रभाग 9 श्री. बजरंग कुलकर्णी 368 मतदारांचे पुनर्वर्गीकरण 368 पैकी 31 मतदार पात्र — हरकत अंशतः योग्य
प्रभाग 12 → प्रभाग 11 श्री. कळमंडे 20 मतदारांचे हस्तांतरण सर्वेक्षणात हरकत योग्य ठरली; दुरुस्ती कार्यवाही अधीन प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर दिनांक 03 डिसेंबर 2025 पर्यंत हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. सर्व प्राप्त हरकतींची नियुक्त पथकांकडून स्थलसर्वेक्षण व पडताळणी केली जाईल.
पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आवश्यक दुरुस्ती केली जाईल.
अंतिम मतदार यादी दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

महानगरपालिकेमार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येते की प्रारूप मतदार यादीमध्ये आपल्या नावाची नोंद, पत्ता, प्रभाग व मतदार तपशील योग्यरीत्या नोंद झाला आहे का ते तपासावे. कोणतीही त्रुटी अथवा हरकत असल्यास निर्धारित कालावधीत ती नोंदवावी.
या पाहणीदरम्यान सहाय्यक आयुक्त श्री. गिरीश पंडित, सहायक अभियंता श्री. रामचंद्र पेंटर, श्री. प्रदीप निकते, श्री. संदीप भोसले, पथक समन्वयक सौ. दीपाली मेटकरी, श्री. योगीराज याटकर, उपतुकडी प्रमुख जे. के. स्वामी व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

More Stories
नवा पूल बांधण्यासाठी मरीआई चौक ते अण्णाभाऊ साठे चौक (भैय्या चौक) वर्षभरासाठी बंद ; ९ डिसेंबर पासून वाहतुक बदलणार
बे-कायदा शौचालय पाडण्याच्या प्रकारणी नागेश कोरे यांच्यावर गुन्हा दाखल
महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूरात भव्य रक्तदान शिबिर ‘परिवर्तन समूह’चा मानवतेचा संदेश