महाराष्ट्र

राजेश अग्रवाल यांनी राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला

मुंबई : राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला. मावळते मुख्य सचिव राजेशकुमार यांच्याकडून अग्रवाल यांनी कार्यभार स्विकारताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रम पार पडला.

राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच अग्रवाल यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला होता. पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना ते म्हणाले,
“महाराष्ट्राचा विकास आणि गौरव वाढवण्यासाठी प्रभावीपणे कार्यरत राहू.”

या पदग्रहण प्रसंगी अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा वर्मा, सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा, कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव (अ.व.सु) राधिका रस्तोगी, मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वैद-सिंगल, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकज कुमार, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव रामास्वामी एन., दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह यांचा समावेश होता.

तसेच मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांच्यासह मुख्य सचिव कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीही यावेळी उपस्थित होते.

राज्याच्या प्रशासनात नव्या मुख्य सचिवांच्या रूपाने नेतृत्व बदल झाल्याने शासन यंत्रणेच्या कामकाजात नव्या दिशेची अपेक्षा व्यक्त होत आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!