सोलापूर

सोलापूर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलचा दणदणीत विजय; विरोधकांचे डिपॉझिट जप्त

सोलापूर (प्रबुध्द राज न्युज) :- सोलापूर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था क्रमांक २ मर्यादित, सोलापूर यांच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलने विक्रमी आघाडी घेत विरोधकांचा पूर्णतः धुव्वा उडवला आहे. निवडणुकीत उभे राहूनही विरोधकांना एकाही जागेवर समाधान मानता आले नाही, उलट त्यांच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असून त्यांना पुलिंग एजंट देखील मिळाला नाही. विरोधकांची अशी दयनीय अवस्था ही निवडणुकीतील सर्वात चर्चेची बाब ठरली.

Oplus_16908288

सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना संधी देऊन ही निवडणूक लढविण्यास सांगितले होते. मात्र, पतसंस्थेच्या प्रगतीविरोधात हट्टाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना मतदारांनी कडाडून नाकारल्याचे निकालातून स्पष्ट झाले.

विजयी उमेदवारांची यादी :

सर्वसाधारण मतदारसंघातून विजयी

गिरीश जाधव
सुधाकर माने देशमुख
श्रीकांत धोत्रे
श्रीकृष्ण घंटे
शशिकांत साळुंखे
यादव मोहन
अंकुश कोळेकर
दिनेश बनसोडे
समीर शेख
भीमाशंकर वाले

भटक्या विमुक्त प्रवर्गातून :

रणजीत घोडके

ओबीसी मतदारसंघातून :

शिवाजी कांबळे

महिला मतदारसंघातून :
राणी सुतार
संगीता हंडे

बिनविरोध विजयी :
प्रदीप सकट
एकूण १५ उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले.

या विजयानंतर पॅनलमध्ये जल्लोषाचे वातावरण असून पॅनल प्रमुख महेश जाधव आणि रणजीत घोडके यांनी ही जीत पतसंस्थेच्या सर्व सभासदांच्या विश्वासाची असल्याचे सांगितले.

Oplus_16908288

निवडणूक नियोजनात राजेंद्र माशाळ, रामस्वामी मनलोर, सिद्धाराम बोरुटी, अविनाश गोडसे आणि रवी कोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

प्रचार प्रमुख गिरीश जाधव आणि शिवाजी कांबळे यांनी मतदारांशी संपर्क साधून संस्थेने केलेल्या कामाची मांडणी केल्यामुळे मोठी आघाडी मिळाल्याचे सांगण्यात आले.

विजय मिळालेल्या सत्ताधारी पॅनलने संस्थेचे कामकाज पारदर्शक, सदस्य केंद्रित आणि विकासाभिमुख ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर मतदारांनी व्यक्त केलेल्या भावना ऐकता, “काम केले त्यांनाच मत मिळाले; संस्था योग्य हातात राहिली,” अशी प्रतिक्रिया अनेक सभासदांकडून व्यक्त करण्यात आली.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!