सोलापूर (प्रतिनिधी):-इंदिरा ज्ञानवर्धिनी, सोलापूर संचलित श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, सोलापूर येथे विद्यार्थ्यांची *” नियमित वार्षिक आरोग्य तपासणी”* संपन्न झाली. या उपक्रमाचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले.
या तपासणीसाठी विशेषतः त्वचारोग तज्ञ, रोटेरियन व समाजसेविका डॉ. सरोज पाटील तसेच होटगी नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सरिका होमकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांची सखोल आरोग्य तपासणी केली. या आरोग्य तपासणीत विद्यार्थ्यांचे वजन, उंची, दृष्टी, दात, त्वचा, तसेच सर्वसाधारण आरोग्य स्थितीची तपासणी करण्यात आली.

तपासणी दरम्यान विद्यार्थ्यांना दैनंदिन स्वच्छतेचे महत्त्व, योग्य आहाराचे फायदे, व्यायामाचे महत्त्व, तसेच विविध आजारांपासून बचावाचे उपाय याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य तज्ञांनी विद्यार्थ्यांना नियमित हात धुणे, शुद्ध पाणी पिणे, तसेच स्वच्छ आणि संतुलित जीवनशैली ठेवण्याचे आवाहन केले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढीस लागली असून पालकांनाही आवश्यक सल्ला देण्यात आला.
या आरोग्य तपासणी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. दत्तात्रय गाजरे यांचे मार्गदर्शन लाभले. हा आरोग्य तपासणी शिबिर संपन्न करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
या वार्षिक नियमित विद्यार्थ्यांच्या यशस्वी आरोग्य तपासणी आयोजनाबाबत संस्थेचे अध्यक्ष श्री विपिन ठोकळ,उपाध्यक्ष श्री सचिन ठोकळ, संचालिका सौ शिल्पाताई ठोकळ व सचिव श्री भिकाजी गाजरे यांनी कौतुक केले.








