क्राईम

सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी धडक कारवाई!देसी बनावटीचे पिस्तूल २ काडतुसे जप्त – एक आरोपी जेरबंद

सोलापूर (प्रतिनिधी) :- आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुक-2025 च्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण जिल्हयातील निवडणुका शांततामय व भयमुक्त वातावरणामध्ये पार पाडाव्यात त्याकरीता मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी जिल्हयातील अवैध रित्या शस्त्र बाळगणारे यांचेवर लक्ष ठेवुन योग्य ती कारवाई करणेबाबत पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांना व सुचना देवुन आदेशीत केले होते.

सदर आदेशाच्या अनुषंगाने श्री. संजय जगताप स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधीकारी व अंमलदार यांना सोलापूर ग्रामीण जिल्हयात अवैध रित्या शस्त्र बाळगणा-यांचे शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते.

सहा. पोलीस निरीक्षक / भिमगोंडा पाटील, स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक हे सोलापूर तालुका पोलीस ठाणे अवारात हजर असताना पथकातील पोहवा / विजयकुमार भरले यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, इसम नामे हुसेनबाशा सय्यद, रा. सोलापूर हा अंगात गडद जांबळया रंगाचा शर्ट व पांढ-या रंगाची पॅन्ट घालुन सोलापूर ते विजयपुर या महामार्गावर असलेल्या नांदणी टोल नाक्याच्या काही अंतरावर असलेले हॉटेल शरण बसवेश्वरच्या पुढे देशी बनावटीचे पिस्टल व राउंड सोबत बाळगुन उभा आहे. सपोनि भिमगोंडा पाटील यांनी लागलीच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री संजय जगताप यांना मिळालेली बातमी सांगितली असता, त्यांनी तात्काळ पथकासह कारवाई करण्याचे आदेश दिले. सदर बातमीच्या ठिकाणी सहा. पोलीस निरीक्षक / भिमगोंडा पाटील व त्यांचे पथक पोहोचुन हॉटेल शरण-बसवेश्वरच्या पुढे एका मोटार सायकल शेजारी उभा असलेला इसमाच्या अंगावरील कपडयावरून बातमी प्रमाणे संशय आल्याने पथकाने त्यास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमास त्याचे नांव गाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव हुसेनबाशा अ. रजाक सय्यद वय- 46 वर्षे, रा. घर नं 60 जवाहर नगर, शेळगी, सोलापूर असे असल्याचे सांगितले.

Oplus_16908288

सदर इसमाची झडती घेतली असता त्याच्या पॅन्टीत खवलेले 1 देशी बनावटी पिस्टल व 2 जिवंत काडतुस त्याचे ताब्यात मिळुन आले आहे. आरोपी याचेकडे अधीक तपास करता सदरचे 1 देशी बनावटी पिस्टल व 2 जिवंत काडतुस हे चांद रा. कंचनाळ ता. इंडी राज्य कर्नाटक याचेकडुन घेतले असल्याचे सांगितले. सदर आरोपी विरुद्ध मंद्रुप पोलीस ठाणे गुरनं 399/2025 भारतीय शस्त्र अधीनियम 1959 चे कलम 3,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात 1 देशी बनावटी पिस्टल व 2 जिवंत काडतुस व 1 मोटार सायकल असा एकुण 35,400/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास मंद्रुप पोलीस ठाणे करीत आहे.

नमुद उल्लेखनीय कामगिरी मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, मा. श्री. प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. संजय जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक / भिमगोंडा पाटील, पोउपनि / डांगे व पथकातील पोहेकॉ सलीम बागवान, विजयकुमार भरले, पोकॉ/ प्रमोद शींपाळे, चापोकों/ दिलीप थोरात यांनी बाजवली आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!