सोलापूर

आधार कार्डमध्ये बदल करायचा आहे? मग ही संधी अजिबात चुकवू नका!

नोंदणी, दुरुस्ती, बायोमेट्रिक अपडेटसह सर्व सुविधा एकाच ठिकाणी

आधार कार्डमध्ये बदल करायचा आहे? मग ही संधी अजिबात चुकवू नका!

नोंदणी, दुरुस्ती, बायोमेट्रिक अपडेटसह सर्व सुविधा एकाच ठिकाणी

सोलापूर : भारतीय डाक विभागाच्या सोलापूर पोस्टल विभागामार्फत नागरिकांच्या सोयीसाठी रविवार, २० जुलै २०२६ रोजी ‘महाआधार नोंदणी व दुरुस्ती शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. हे विशेष शिबिर सोलापूर मुख्य टपाल कार्यालय, रेल्वे स्टेशनसमोर येथे सकाळी ८ ते सायंकाळी ७ या वेळेत होणार असून, दिवसभर आधारसंबंधित विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

या शिबिरात नवीन आधार नोंदणी, आधारमधील नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल अद्ययावत करणे, छायाचित्र, बोटांचे ठसे व डोळ्यांच्या बुबुळांचे (आयरिस) बायोमेट्रिक अपडेट, तसेच ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांचे अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट आणि १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतरचे बायोमेट्रिक अद्ययावतीकरण अशा सर्व महत्त्वाच्या सेवा दिल्या जाणार आहेत. याशिवाय इतरही आधारसंबंधित सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या शिबिरासाठी इच्छुक नागरिकांनी आगाऊ नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले असून, त्यासाठी गुगल फॉर्मद्वारे अपॉइंटमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

भारतीय डाक विभागाने नागरिकांनी या संधीचा लाभ घेत मोठ्या संख्येने शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. एकाच ठिकाणी आणि विस्तारित वेळेत विविध आधार सेवा उपलब्ध होत असल्याने नागरिकांची गैरसोय टळणार असून, आधार अद्ययावत करण्यासाठी ही उत्तम संधी असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!