सोलापूर

जिल्हा परिषद सोलापूरच्या पब्लिक रिलेशन्स ऑफिसर (PRO)पदी महताब शेख यांची नियुक्ती

जिल्हा परिषद सोलापूरच्या पब्लिक रिलेशन्स ऑफिसर (PRO)पदी महताब शेख यांची नियुक्ती

सोलापूर, दि. — जिल्हा परिषद सोलापूरच्या विविध लोकाभिमुख योजना, विकासकामे, शैक्षणिक उपक्रम तसेच जनकल्याणकारी निर्णयांची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने महताब शेख यांची पब्लिक रिलेशन्स ऑफिसर (PRO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शैक्षणिक, सामाजिक तसेच माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांचा अनुभव, प्रभावी संवादकौशल्य, जनसंपर्क क्षेत्रातील कार्य आणि विविध उपक्रमांच्या यशस्वी प्रसिद्धीमधील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या नियुक्तीमुळे जिल्हा परिषद सोलापूर आणि प्रसारमाध्यमांमधील संवाद अधिक सक्षम, गतिमान आणि पारदर्शक होणार आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांशी संबंधित योजना, विकासकामे, नवकल्पना, उपक्रम आणि प्रशासनाच्या निर्णयांची अधिकृत माहिती पत्रकार बांधवांना वेळेवर उपलब्ध करून देण्याचे कार्य महताब शेख यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.

याबाबत सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींना आवाहन केले आहे की, जिल्हा परिषद सोलापूरशी संबंधित कोणतीही माहिती, प्रश्न, सूचना किंवा विविध विषयांवरील शंका असल्यास त्यांनी पब्लिक रिलेशन्स ऑफिसर महताब शेख यांच्याशी संपर्क साधावा. प्राप्त प्रश्नांचे संकलन करून त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन हे दर शुक्रवारी अधिकृत भूमिका व सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांना उपलब्ध करून देणार आहेत.

या उपक्रमामुळे जिल्हा परिषद सोलापूरच्या विकासाभिमुख आणि लोककल्याणकारी कामांची माहिती अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचणार असून, प्रशासन आणि प्रसारमाध्यमांमधील समन्वय अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!