सोलापूर

जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात; शिवरायांच्या प्रशासन व्यवस्थेचा जयकुमार गोरे यांनी केला गौरव

शिवस्वराज्याच्या विचारांचा जागर; जिल्हा परिषदेत दिमाखदार शिवराज्याभिषेक सोहळा

जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात; शिवरायांच्या प्रशासन व्यवस्थेचा जयकुमार गोरे यांनी केला गौरव

शिवस्वराज्याच्या विचारांचा जागर; जिल्हा परिषदेत दिमाखदार शिवराज्याभिषेक सोहळा

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी जात, धर्म आणि पंथ यापलीकडे जाऊन सर्व समाजघटकांना एकत्र आणत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्य उभारण्यासाठी त्यांनी उभी केलेली प्रशासन व्यवस्था आजही आदर्शवत मानली जाते, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

जिल्हा परिषद सोलापूरच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, महापौर विनायक कोंड्याल, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार, स्थायी समितीच्या चेअरमन रंजीता चाकोते, महिला व बालकल्याण सभापती अॅड. अमृता वाघे, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, पंचायत समिती सभापती तेजस्वी बोराडे, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, सूर्यकांत भुजबळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, नगरसेवक नरेंद्र काळे, विनोद भोसले, शिक्षणाधिकारी कादर शेख ,जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे, नगरसेविका रोहिणी तळवळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्वराज्य गुढीचे पूजन करून शिवस्वराज्य दिनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी परिसर शिवमय वातावरणाने भारावून गेला होता.

 

आपल्या भाषणात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा गौरव करताना सांगितले की, मुघलांच्या बलाढ्य सत्तेला तोंड देताना शिवरायांनी सक्षम आणि लोकाभिमुख प्रशासन उभारले. सर्व समाजघटकांचा सहभाग घेऊन त्यांनी स्वराज्याची पायाभरणी केली. त्यांचा हा आदर्श आजच्या प्रशासन व्यवस्थेलाही प्रेरणा देणारा आहे.

कार्यक्रमात मोहोळच्या स्वानंद परिवारातील महेश कोठीवाले, सायली साठे, बापूसाहेब दळवी तसेच कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी सादर केलेल्या शिवगीतांनी उपस्थितांना शिवकालीन इतिहासाची अनुभूती दिली. वंदे मातरम्, राष्ट्रगीत आणि राज्यगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या हस्ते पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा शिवचरित्र ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या संकल्पनेतून शिवचरित्र भेट देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अधीक्षक अनिल जगताप, प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, स्थापत्य अभियंता चेतन वाघमारे, समन्वयक अनिल पाटील, कनिष्ठ सहाय्यक रेवणनाथ व मेहताब शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.

शिवरायांच्या कार्याचा गौरव, स्वराज्याच्या मूल्यांची जपणूक आणि नव्या पिढीपर्यंत इतिहास पोहोचविण्याचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!