“शेवटच्या मताने पलटली बाजी! 30 मतांची आघाडी… आणि अखेर धक्कादायक पराभव”
“फक्त १ मत ठरलं गेमचेंजर! दिग्गज मंत्र्यांचा थरारक पराभव”
“शेवटच्या मताने पलटली बाजी! 30 मतांची आघाडी… आणि अखेर धक्कादायक पराभव”
“फक्त १ मत ठरलं गेमचेंजर! दिग्गज मंत्र्यांचा थरारक पराभव”
तामिळनाडू :- तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत एका मताने ठरलेला निकाल सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. के आर पेरियाकरुप्पन यांसारख्या दिग्गज नेत्याला इतक्या अल्प फरकाने पराभव पत्करावा लागेल, अशी कुणालाही अपेक्षा नव्हती.
श्रीनिवासन सेतूपती यांनी केवळ १ मताच्या फरकाने विजय मिळवत सर्वांनाच धक्का दिला. त्यांना ८३,३७५ मते, तर पेरियाकरुप्पन यांना ८३,३७४ मते मिळाली. विशेष म्हणजे, शेवटच्या फेरीपर्यंत पेरियाकरुप्पन हे तब्बल ३० मतांनी आघाडीवर होते. मात्र अंतिम क्षणी एका मताने संपूर्ण समीकरण बदलले.
ही लढत तिरुप्पत्तूर विधानसभा मध्ये रंगली होती, जिथे निवडणुकीत आणखी एक महत्त्वाचा घटक ठरला , मतदारांचा बहिष्कार. आर. पलकुरूची पंचायत येथील सुमारे २,००० मतदारांनी प्रशासनाच्या सीमा वादावर नाराजी व्यक्त करत मतदान टाळले. या बहिष्काराचा थेट परिणाम निकालावर झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
पेरियाकरुप्पन हे DMK चे ज्येष्ठ नेते असून, २००६ पासून ते सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. राज्यात सत्ता आल्यानंतर त्यांच्याकडे ग्रामविकास खात्याची जबाबदारी देण्यात आली होती, तर नंतर सहकार मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. शिवगंगा जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा राहिला आहे.
या निकालाने एक गोष्ट पुन्हा अधोरेखित केली आहे,
लोकशाहीत प्रत्येक मत महत्त्वाचे असते!
एक मत विजय देऊ शकते, आणि एक मत पराभवही… तामिळनाडूमधील ही घटना त्याचाच जिवंत पुरावा ठरली आहे



