वृक्षारोपणातून ‘सेवा संकल्प’चा शुभारंभ; दक्षिण सोलापूर पंचायत समितीत सेवाज्योत बाइक रॅली

वृक्षारोपणातून ‘सेवा संकल्प’चा शुभारंभ; दक्षिण सोलापूर पंचायत समितीत सेवाज्योत बाइक रॅली
सोलापूर : मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १७ सप्टेंबर २०२६ रोजी ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू करण्यात आले. या अभियानाची दक्षिण सोलापूर तालुक्यातील सुरुवात पंचायत समिती परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते वृक्षारोपण करून अभियानाचा शुभारंभ झाला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती केदार सावंत, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, प्रसाद मिरकले, पंचायत समिती सदस्य विजय राठोड, बलवान गोतसुर्वे, सहायक गट विकास अधिकारी सनी चव्हाण, बाल विकास प्रकल्प अधिकारी विशाल भोसले, तालुका वैद्यकीय अधिकारी निलम घोगरे, उपअभियंता ग्रापापु दत्तात्रय सोनवणे आणि उपअभियंता एजाज मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्याचे आवाहन केले. ग्रामस्तरावर लोकाभिमुख उपक्रम राबविणे, लोकसहभाग वाढविणे तसेच विविध विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासनाने प्रभावीपणे काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
अभियानाच्या माध्यमातून गावपातळीवर नागरिकांच्या सहभागातून विविध उपक्रम राबवून शासनाच्या योजना आणि विकासकामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

• वृक्षारोपणानंतर ‘सेवाज्योत’ बाइक रॅली •
अभियानाच्या उद्घाटनानंतर पंचायत समिती परिसरातून ‘सेवाज्योत बाइक रॅली’ काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून सेवा संकल्प अभियानाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गट विकास अधिकारी मनोज राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी मनीषा वास्ते, कृषी अधिकारी उमेश काटे, विस्तार अधिकारी सुरेश राठोड, शिवानंद सोलापुरे, ज्योतीराम भोसले, सदाशिव कोळी, तसेच समीर शेख, मृणालनी शिंदे, ऋषिकेश जाधव, शरद वाघमारे, जिलानी अन्सारी, अभिमन्यू कांबळे, विनायक कुंचपोर, सुधीर फुलारी, रुपाली मोरे, स्नेहा जाधव, गजेंद्र कुमटेकर, मिलन बिराजदार, अंजली पाटील, संदीप घोडके, अश्विनी बिराजदार, सचिन अंबेकर, अविनाश गायकवाड, कैलास जिंदे आणि पंडित व्हनमाने यांनी परिश्रम घेतले.
दक्षिण सोलापूर तालुक्यात सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, लोकसहभाग आणि ग्रामविकासाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.



