महाराष्ट्र

दैनिक प्रबुध्द राज इफेक्ट! विजापूर रोडवरील धोकादायक बोर्ड संध्याकाळपर्यंत दुरुस्त

‘पुढे शाळा आहे, हळू चाला’ म्हणणारा झुकलेला फलक अखेर सुरक्षित; विद्यार्थ्यांसह नागरिकांकडून ‘दैनिक प्रबुध्द राज’चे अभिनंदन

दैनिक प्रबुध्द राज इफेक्ट! विजापूर रोडवरील धोकादायक बोर्ड संध्याकाळपर्यंत दुरुस्त

‘पुढे शाळा आहे, हळू चाला’ म्हणणारा झुकलेला फलक अखेर सुरक्षित; विद्यार्थ्यांसह नागरिकांकडून ‘दैनिक प्रबुध्द राज’चे अभिनंदन

सोलापूर : विजापूर रोडवरील वनविभागाच्या शेजारी आणि श्री संत तुकडोजी महाराज शाळेजवळ रस्त्याच्या दिशेने धोकादायकरीत्या झुकलेल्या मोठ्या लोखंडी फलकाची ‘दैनिक प्रबुध्द राज’ने बातमी प्रसिद्ध करताच प्रशासनाने तातडीने दखल घेतली. नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकणारा हा फलक संध्याकाळपर्यंत दुरुस्त करून सुरक्षित करण्यात आला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडत प्रशासनाचे आभार मानले असून, या प्रश्नाकडे लक्ष वेधल्याबद्दल ‘दैनिक प्रबुध्द राज’चे विशेष अभिनंदन केले आहे.

विजापूर रोडवरील या वर्दळीच्या मार्गावर मोठ्या आकाराचा लोखंडी फलक बराचसा रस्त्याच्या दिशेने झुकलेल्या अवस्थेत होता. विशेष म्हणजे या फलकावर ‘पुढे शाळा आहे, हळू चाला’ असा संदेश देण्यात आला होता. मात्र, विद्यार्थ्यांना सावध करणारा हाच फलक स्वतःच धोकादायक बनल्याचे चित्र ‘दैनिक प्रबुध्द राज’ने छायाचित्रासह निदर्शनास आणून दिले होते.

• बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाची तत्परता •

या धोकादायक परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन ‘दैनिक प्रबुध्द राज’ने प्रशासनाचे लक्ष वेधले. शाळेच्या परिसरात दररोज विद्यार्थी, पालक, पादचारी तसेच मोठ्या संख्येने वाहनांची ये-जा होत असल्याने कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी फलकाची दुरुस्ती होणे आवश्यक असल्याचे बातमीत स्पष्ट करण्यात आले

बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित प्रशासनाने तातडीने हालचाली करत संध्याकाळपर्यंत झुकलेल्या फलकाची दुरुस्ती केली. त्यामुळे संभाव्य दुर्घटनेचा धोका टळला असून, नागरिकांनी प्रशासनाच्या तत्परतेचेही स्वागत केले आहे.

• विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून ‘दैनिक प्रबुध्द राज’चे कौतुक •

फलकाची दुरुस्ती झाल्यानंतर परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. “प्रशासनाच्या निदर्शनास हा प्रश्न आणून दिल्यामुळे आज धोकादायक फलक सुरक्षित झाला. एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रश्न मांडणे हीच पत्रकारितेची खरी भूमिका आहे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

‘दैनिक प्रबुध्द राज’ने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न मांडला आणि प्रशासनाने त्याची तातडीने दखल घेतली, याबद्दल आम्ही दोघांचेही आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.

‘दैनिक प्रबुध्द राज’कडून केवळ बातमी प्रसिद्ध करून विषय संपविण्याऐवजी नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जातो. विजापूर रोडवरील या धोकादायक फलकाच्या प्रकरणातही त्याचीच प्रचिती आली.

बातमी प्रसिद्ध झाली आणि काही तासांतच धोकादायक फलक दुरुस्त झाला, यामुळे ‘दैनिक प्रबुध्द राज’च्या बातमीचा प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

फलक आणखी झुकून रस्त्यावर कोसळण्याची किंवा विद्यार्थी, पादचारी अथवा वाहनधारकांना त्याचा फटका बसण्याची शक्यता होती. मात्र, वेळीच दुरुस्ती झाल्याने संभाव्य दुर्घटना टळली आहे.

याबद्दल परिसरातील नागरिकांनी महापालिका व संबंधित प्रशासनाचे आभार मानले असून, नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित तक्रारी आणि बातम्यांची तातडीने दखल घेतल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक केले आहे.

‘दैनिक प्रबुध्द राज’ने प्रश्न मांडला, प्रशासनाने दखल घेतली आणि संभाव्य धोका टळला – हीच सकारात्मक पत्रकारितेची ताकद असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!