राज्यात आयएएस अधिकाऱ्यांची मोठी फेरबदल; कुठून कुठे बदली? संपूर्ण यादी जाहीर

राज्यात आयएएस अधिकाऱ्यांची मोठी फेरबदल; कुठून कुठे बदली? संपूर्ण यादी जाहीर
मुंबई (प्रतिनिधी ):- राज्य शासनाने २ एप्रिल २०२६ रोजी आयएएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या जाहीर केल्या असून, एकूण २५ अधिकाऱ्यांची नियुक्ती व बदली करण्यात आली आहे. या फेरबदलामुळे राज्यातील प्रशासनात मोठे बदल घडले असून विविध जिल्हे, महापालिका व महामंडळांमध्ये नवे नेतृत्व नियुक्त झाले आहे.
*कुठून कुठे बदली? (सविस्तर)*
* श्री जी. श्रीकांत – छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त – जल जीवन मिशन, नवी मुंबई (CEO)
* श्री दिलीप स्वामी – जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला (MD)
सौ. वर्षा ठाकूर-घुगे – जिल्हाधिकारी, लातूर – MIDC, मुंबई (Joint CEO)
श्री दीपक सिंगला – PMRDA, पुणे (Additional Commissioner) – मनरेगा, नागपूर (Commissioner)
सौ. के. मंजुलेक्ष्मी – कोल्हापूर महापालिका आयुक्त – PMRDA, पुणे (Additional MC)
डॉ. राजेंद्र भारुड – RUSA, मुंबई (Project Director) – कोल्हापूर महापालिका आयुक्त
डॉ. प्रविणकुमार देवरे – आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे – जिल्हाधिकारी, बुलढाणा
डॉ. भारत बस्तेवाड – मनरेगा, नागपूर (Commissioner) – जिल्हाधिकारी, लातूर
सौ. वर्षा लड्डा – कृषी शिक्षण परिषद, पुणे – अमरावती महापालिका आयुक्त
श्री अमोल येडगे – जिल्हाधिकारी, कोल्हापूर – छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त
डॉ. विजय राठोड –
MIDC, मुंबई (Joint CEO) – जिल्हाधिकारी, कोल्हापूर
श्री विनय गौडा – जिल्हाधिकारी, चंद्रपूर → जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर
डॉ. किरण पाटील – जिल्हाधिकारी, बुलढाणा – आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे
डॉ. मंगेश गोंडावळे – MAIDC, मुंबई (MD) – जिल्हाधिकारी, गोंदिया
कुमार आशीर्वाद – जिल्हाधिकारी, सोलापूर – जिल्हाधिकारी, नागपूर
सौ. वासुमना पंत – अतिरिक्त आयुक्त, नागपूर महापालिका – जिल्हाधिकारी, चंद्रपूर
श्री प्रजित नायर – जिल्हाधिकारी, गोंदिया – अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका
श्री अंकित – CEO, जि.प. छत्रपती संभाजीनगर – अतिरिक्त आयुक्त, नागपूर महापालिका
कार्तिकेयन एस – CEO, जि.प. कोल्हापूर – जिल्हाधिकारी, सोलापूर
सौ. संजिता मोहापात्रा – CEO, जि.प. अमरावती – महापालिका आयुक्त, सांगली-मिरज-कुपवाड
सौ. मिन्नू पी.एम. – CEO, जि.प. जालना – CEO, जि.प. छत्रपती संभाजीनगर
श्री सत्याम गांधी – महापालिका आयुक्त, सांगली – CEO, जि.प. अमरावती
सौ. जॅस्मिन – सहाय्यक जिल्हाधिकारी, रत्नागिरी – CEO, जि.प. कोल्हापूर
सौ. अंजली शर्मा – महापालिका आयुक्त, जालना
श्री कृष्णकांत कन्वारिया – सहाय्यक जिल्हाधिकारी, नंदुरबार – CEO, जि.प. जालना
या बदलांमुळे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तसेच विविध महामंडळांच्या प्रमुख पदांवर नवीन अधिकारी नियुक्त झाले आहेत. अनुभवी आणि तरुण अधिकाऱ्यांचा समतोल साधत शासनाने प्रशासन अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्य शासनाच्या या मोठ्या निर्णयामुळे प्रशासनात नवे समीकरण तयार झाले असून, विविध जिल्ह्यांमध्ये विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेषतः सोलापूर, नागपूर आणि कोल्हापूरसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये या बदलांचा परिणाम लवकरच दिसून येण्याची शक्यता आहे.



