सोलापूर

जिल्हा परिषदेत अचानक आनंदाचे वातावरण; वाहन चालक व परिचर कर्मचाऱ्यांना मिळाला कोणता फायदा?

जिल्हा परिषदेत अचानक आनंदाचे वातावरण; वाहन चालक व परिचर कर्मचाऱ्यांना मिळाला कोणता फायदा?

सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या वर्ग ३ वाहन चालक आणि वर्ग ४ परिचर कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती (ACP) योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

दि. १० मार्च २०२६ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या आदेशानुसार एकूण ९० कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे संबंधित कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

माहितीनुसार, वाहन चालक संवर्गातील कर्मचाऱ्यांमध्ये पहिल्या लाभासाठी ३ तर तिसऱ्या लाभासाठी १ कर्मचारी पात्र ठरले आहेत. तर परिचर संवर्गातील कर्मचाऱ्यांमध्ये पहिल्या लाभासाठी ४२, दुसऱ्या लाभासाठी २९ आणि तिसऱ्या लाभासाठी १५ कर्मचारी अशा एकूण ९० कर्मचाऱ्यांना लाभाचे आदेश देण्यात आले आहेत.

ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासन विभागाने विशेष प्रयत्न केले. यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन साळुंखे, प्रदीप सगट तसेच कनिष्ठ सहाय्यक अरविंदकुमार सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

सातव्या वेतन आयोगानुसार आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी झाल्यामुळे कर्मचारी संघटनांकडून मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

या निर्णयामुळे वाहन चालक व परिचर संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तींमध्ये सकारात्मक बदल होऊन त्यांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याचेही कर्मचारी वर्गातून सांगण्यात येत आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!