क्राईम

सोलापूर–हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, ८ गंभीर जखमी

सोलापूर (प्रतिनिधी): सोलापूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला असून यात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. क्रुजर जीपचा टायर अचानक फुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर येथील काही नागरिक देवदर्शनासाठी नळदुर्गकडे निघाले होते. दरम्यान, धाराशिव तालुक्यातील अणदूर परिसरात जीपचा टायर फुटला आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यावेळी जीप ट्रॅक्टरला धडकून रस्त्याच्या कडेला पलटी झाली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की वाहनाचा पुढचा भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे.

Oplus_16908288

अपघातात मृत्यू पावलेल्या ५ जणांमध्ये ३ महिलांचा समावेश आहे. जीप पलटी झाल्यामुळे काही प्रवासी वाहनाखाली दबले होते. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढले.

Oplus_16908288

या भीषण दुर्घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी तातडीने सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची अवस्था चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Oplus_16908288

क्रुजर वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसले होते, अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे. मृत आणि जखमी सर्वच प्रवासी दक्षिण उळे सोलापूर परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून देवदर्शनासाठी निघालेल्या भक्तांवर काळाने घाला घातल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!