महाराष्ट्र

जिल्हा परिषद शाळांचा आदर्श राज्यभर राबवा; गुणवत्तापूर्ण शिक्षणासह विद्यार्थीसंख्या वाढविण्यावर भर

प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करा, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना दर्जेदार गणवेश द्या – शिक्षणमंत्री दादाजी भुसे

जिल्हा परिषद शाळांचा आदर्श राज्यभर राबवा; गुणवत्तापूर्ण शिक्षणासह विद्यार्थीसंख्या वाढविण्यावर भर

प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करा, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना दर्जेदार गणवेश द्या – शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई : राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देत विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. या शाळांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्यातील सर्व शासकीय शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत.

मंत्रालयात आयोजित शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या तयारीचा आढावा घेताना त्यांनी शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला.

भुसे म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे उत्साहवर्धन करण्यासाठी प्रत्येक शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात यावा. तसेच विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी दर्जेदार गणवेश उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात यावी. विद्यार्थ्यांमध्ये शाळेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

यावेळी त्यांनी शाळा परिसराच्या स्वच्छतेवरही विशेष भर दिला. शाळा सुरू होण्यापूर्वी स्वच्छता, सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांची तपासणी पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले. स्वच्छ आणि आकर्षक शाळा परिसरामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि पालकांचा विश्वास वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याबाबत माहिती देताना भुसे यांनी सांगितले की, बालभारतीमार्फत राज्यातील सुमारे ८० टक्के पाठ्यपुस्तके शाळांपर्यंत पोहोचविण्यात आली आहेत. उर्वरित पुस्तकेही शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या हाती पोहोचतील यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी.

बैठकीस प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देत शासकीय शाळांबाबत विश्वास वाढविण्याच्या दृष्टीने या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णयांवर चर्चा करण्यात आली.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!