क्राईम

गर्भलिंग निदान करणाऱ्या बोगस डॉक्टरवर आरोग्य व पोलीस विभागाची संयुक्त कारवाई; सोनोग्राफी मशीनसह आरोपी अटकेत

गर्भलिंग निदान करणाऱ्या बोगस डॉक्टरवर आरोग्य व पोलीस विभागाची संयुक्त कारवाई; सोनोग्राफी मशीनसह आरोपी अटकेत

बार्शी (प्रतिनिधी):- गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर आरोग्य विभाग आणि पोलीस विभागाने संयुक्तपणे धडक कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे जामगाव (हदवी) परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत सोनोग्राफी मशीन, गर्भपातासाठी वापरले जाणारे औषधे व साहित्य जप्त करत आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई बुधवार, दि. ७ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, क्रेटा कार (क्रमांक एम.एच. ४५ एझेड-२१६६) मधून बेकायदेशीररित्या सोनोग्राफी करून गर्भलिंग निदान तसेच गर्भपात केला जात असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार आरोग्य विभाग व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने जामगाव हदवी परिसरात सापळा रचून ही कारवाई केली.

या कारवाईत आरोपी अजिन सुरेश मस्तुद (वय ३६, रा. रोपळे, ता. माढा, जि. सोलापूर) यास अटक करण्यात आली. तपासादरम्यान त्याच्याकडून झोन केअर कंपनीची सोनोग्राफी मशीन, गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या Gestapro कंपनीच्या गोळ्या, combi pack of mifepristone and misoprostol, तसेच Gestapro कंपनीच्या गोळ्यांची रिकामी पाकिटे आणि गर्भपातासाठी वापरले जाणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

सदर कारवाई ग्रामीण रुग्णालय बार्शीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. शीतल बोपन्लकर आणि बार्शी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या वेळी डॉ. श्रीकांत शिंदे (वैद्यकीय अधिकारी), श्रीमती रूपमती मुंढे (अधिपरिचारिका), शुभम आल्हाट (कक्षसेवक) यांच्यासह आरोग्य विभाग व पोलीस विभागाचे कर्मचारी आणि पंच उपस्थित होते.

गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपात हे गंभीर व कायद्याने दंडनीय गुन्हे असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून आरोपीविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!