महाराष्ट्र

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२५’ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२५’ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. १३ (प्रतिनिधी) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मार्फत ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२५’ स्पर्धा जाहीर करण्यात आली असून राज्यातील पत्रकार, लेखक, छायाचित्रकार, दूरचित्रवाणी वृत्तनिर्माते तसेच समाज माध्यम क्षेत्रातील कार्यकर्त्यांना प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित/प्रसारित झालेल्या लेखन, छायाचित्रे व वृत्तकथा ग्राह्य धरल्या जाणार आहेत. प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत १५ मार्च २०२६ अशी आहे.

राज्यातील इच्छुक स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयातून विहित नमुन्यातील अर्ज घ्यावेत. तर मुंबई शहर व उपनगरातील स्पर्धकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय येथून अर्ज प्राप्त करावेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

*पुरस्कारांचे प्रकार व पारितोषिक*

राज्य शासनामार्फत विविध भाषांतील पत्रकारिता, लेखन, दूरचित्रवाणी वृत्तकथा, छायाचित्रकार, समाज माध्यम तसेच स्वच्छता जनजागृती या क्षेत्रांसाठी खालील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत:

1. अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार – रु. १ लाख, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

2. बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) – रु. ५१ हजार

3. अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) – रु. ५१ हजार

4. बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) – रु. ५१ हजार

5. मौलाना अब्दुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) – रु. ५१ हजार

6. यशवंतराव चव्हाण पुरस्कार (शासकीय गट-मराठी) – रु. ५१ हजार

7. पु.ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार – रु. ५१ हजार

8. तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार – रु. ५१ हजार

9. केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार (शासकीय गट) – रु. ५१ हजार

10. समाज माध्यम पुरस्कार – रु. ५१ हजार

11. स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार – रु. ५१ हजार

12. पत्रकार सुधाकर डोईफोडे अग्रलेखन पुरस्कार – रु. ५१ हजार

*विभागीय पुरस्कार*

राज्यातील विविध विभागांसाठी स्वतंत्र पुरस्कार जाहीर करण्यात आले असून प्रत्येक पुरस्कारास रु. ५१ हजार, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे:

* दादासाहेब पोतनीस पुरस्कार – नाशिक विभाग

* अनंतराव भालेराव पुरस्कार – छत्रपती संभाजीनगर व लातूर विभाग

* आचार्य अत्रे पुरस्कार – मुंबई विभाग

* नानासाहेब परूळेकर पुरस्कार – पुणे विभाग

* शि. म. परांजपे पुरस्कार – कोकण विभाग

* ग. गो. जाधव पुरस्कार – कोल्हापूर विभाग

* लोकनायक बापूजी अणे पुरस्कार – अमरावती विभाग

* ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार – नागपूर विभाग

पत्रकारांसाठी सुवर्णसंधी
राज्य शासनाच्या या प्रतिष्ठित पुरस्कारांमुळे पत्रकारिता क्षेत्रातील गुणवत्ता, समाजाभिमुख लेखन व जनजागृतीला प्रोत्साहन मिळणार आहे. पत्रकार, लेखक, छायाचित्रकार आणि डिजिटल माध्यमातील कार्यकर्त्यांनी १५ मार्चपूर्वी प्रवेशिका सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने केले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!