सोलापूर

सोलापुरात ‘इलेक्ट्रो २०२६’चा टेक्नो-महोत्सव; १२ ते १८ फेब्रुवारीदरम्यान होम मैदानावर भव्य प्रदर्शन

सोलापुरात ‘इलेक्ट्रो २०२६’चा टेक्नो-महोत्सव; १२ ते १८ फेब्रुवारीदरम्यान होम मैदानावर भव्य प्रदर्शन

सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूरकरांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, नव्या युगातील उपकरणे आणि आकर्षक ऑफर्सची पर्वणी घेऊन ‘इलेक्ट्रो २०२६’ हे भव्य इलेक्ट्रॉनिक्स प्रदर्शन १२ ते १८ फेब्रुवारीदरम्यान होम मैदानावर भरत आहे. सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशन (सेडा) तर्फे आयोजित या प्रदर्शनाची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरजरतन धूत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या सात दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार, १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता व्ही प्लस कंपनीचे सीईओ संदीप पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती सेडाचे माजी अध्यक्ष ईश्वर मालू यांनी दिली. यंदा या प्रदर्शनाचे २६ वे वर्ष असून महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा व आसपासच्या राज्यांतील ग्राहक मोठ्या संख्येने भेट देतात.

*तंत्रज्ञान आणि आधुनिक उपकरणांची मेजवानी*

प्रदर्शनात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून एआय आधारित १०० ते १२० इंच टीव्ही, एलईडी टीव्ही, साईड-बाय-साईड फ्रिज, एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह, व्हॅक्यूम क्लिनर, कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर्स, नेटवर्किंग व वाय-फाय प्रॉडक्ट्स, बिझनेस सॉफ्टवेअर, सोलार सिस्टम, मोबाईल, आयपॅड, गॅस गिझर, मिक्सर, फूड प्रोसेसर, आटा चक्की, एअर कुलर, वॉटर प्युरीफायर, स्टॅबिलायझर, चिमणी हुड, फिटनेस इक्विपमेंट्स आदी आधुनिक उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध असणार आहेत. ग्राहकांना विविध योजनांखाली आकर्षक दरात खरेदी करता येणार असून फायनान्स कंपन्यांमार्फत शून्य टक्के व्याजदरावर कर्ज सुविधा उपलब्ध असेल.

*३६० स्टॉल्स आणि डिजिटल अनुभव*

यंदा सुमारे ३६० स्टॉल्स उभारले जाणार असून एक लाखांहून अधिक ग्राहक भेट देतील, असा आयोजकांचा अंदाज आहे. प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे एआय टीव्हीची नवीन श्रेणी, सोलार चार्जर स्टेशन, डिजिटल होम अप्लायन्सेस, बारकोड स्कॅन केल्यावर मोबाईलवर संपूर्ण माहिती, तसेच ५ वेगळे जर्मन हँगर डोम्समध्ये प्री-फॅब्रिकेटेड व कंपनी-फिटेड स्टॉल्स असणार आहेत. प्रदर्शन अधिकाधिक डिजिटल करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

*ग्राहकांसाठी सुविधा आणि आकर्षण*

प्रदर्शनात बसण्याची सोय, मोफत पार्किंग, शुद्ध पिण्याचे पाणी, फूड कोर्ट, व्हीलचेअर सुविधा, फायर ब्रिगेड व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. धुळमुक्त वातावरणासाठी संपूर्ण मैदानावर मॅटींग करण्यात आली आहे. दररोज लकी ड्रॉ तर शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ काढण्यात येणार आहे. तसेच प्रदर्शनादरम्यान दररोज रक्तदान उपक्रम आयोजित केला जाणार आहे.

सुमारे ४५० पदवीधर व एमबीए विद्यार्थ्यांना सेडा तर्फे प्रशिक्षण देऊन ग्राहक मार्गदर्शनासाठी नियुक्त करण्यात येणार आहे. स्टॉलधारक व प्रेक्षकांसाठी सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

*सामाजिक बांधिलकी*

सेडा तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून कर्मचाऱ्यांसाठी शैक्षणिक व वैद्यकीय मदत, प्रशिक्षण व व्यवसायवृद्धी कार्यशाळा आयोजित केल्या जातात. यावर्षीही प्रदर्शनात दोन स्टॉल्स सामाजिक संस्थांसाठी राखीव ठेवण्यात आले असून इच्छुक संस्थांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

*उपस्थित मान्यवर*

या पत्रकार परिषदेस सेडाचे उपाध्यक्ष भुषण भुतडा, सचिव हरीश कुकरेजा, खजिनदार सुयोग कालाणी, सहसचिव गिरीश मुंदडा, संचालक चंद्रकांत शाहपुरे, बसवराज नवले, विजय टेके, तसेच माजी अध्यक्ष आनंद येमूल, ईश्वर मालू, शिवप्रकाश चव्हाण, खुशाल देढिया, केतन शाह व इतर इलेक्ट्रो कमिटी सदस्य उपस्थित होते.

यंदाचे ‘इलेक्ट्रो २०२६’ प्रदर्शन वैविध्यपूर्ण, नाविन्यपूर्ण आणि सुविधायुक्त ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!