सोलापूर

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ : मतदार यादीतील नाव व मतदान केंद्राची माहिती QR कोडद्वारे उपलब्ध

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ : मतदार यादीतील नाव व मतदान केंद्राची माहिती QR कोडद्वारे उपलब्ध

सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर मतदारांसाठी एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदार यादीतील नाव तसेच संबंधित मतदान केंद्राचे नाव शोधण्यासाठी QR कोड स्कॅन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

गुरुवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदारांना ही माहिती पाहता येणार आहे. यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने अधिकृत QR कोड प्रसिद्ध करण्यात आला असून, नागरिकांनी आपल्या मोबाईलद्वारे हा QR कोड स्कॅन करून सहजपणे मतदार यादीतील नाव आणि मतदान केंद्राची माहिती मिळवू शकतात.

महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांनी मतदानाच्या दिवशी कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी आगाऊ स्वरूपात आपली माहिती तपासून ठेवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मतदार यादीत नाव नसल्यास किंवा तपशीलात त्रुटी आढळल्यास वेळेत संबंधित निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधण्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.

ही माहिती आयुक्त तथा शहर निवडणूक अधिकारी, सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीने जाहीर करण्यात आली असून, मतदारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Oplus_16908288
दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!