सोलापूर

सोलापूर जिल्ह्यासाठी २०२६ मध्ये तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर; शासकीय कोषागारेही राहणार बंद

सोलापूर जिल्ह्यासाठी २०२६ मध्ये तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर; शासकीय कोषागारेही राहणार बंद

सोलापूर (प्रतिनिधी):- सन २०२६ साठी सोलापूर जिल्ह्यात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही घोषणा केली असून, या स्थानिक सुट्ट्यांच्या दिवशी शासकीय कार्यालयांसह शासकीय कोषागारेही बंद राहणार आहेत.

जिल्ह्यातील नागरिक, कर्मचारी व अधिकारी यांना महत्त्वाच्या धार्मिक व सांस्कृतिक सणांच्या दिवशी सवलत मिळावी, या उद्देशाने या स्थानिक सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पुढील तीन दिवस सोलापूर जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्ट्या असतील.

घोषित स्थानिक सुट्ट्या खालीलप्रमाणे :

बुधवार, दि. १४ जानेवारी २०२६ – मकरसंक्रांत

शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर २०२६ – अनंत चतुर्दशी

शुक्रवार, दि. ०६ नोव्हेंबर २०२६ – धनत्रयोदशी

या दिवशी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, विभागीय कार्यालये तसेच शासकीय कोषागारे बंद राहणार असल्याने नागरिकांनी आपली शासकीय कामे यानुसार नियोजित करावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, या स्थानिक सुट्ट्या केवळ सोलापूर जिल्ह्यासाठी लागू राहणार असून, संबंधित विभागांनी व कार्यालयांनी याची नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!