सोलापूर

हास्यजत्रा फेम शिवाली परब आणि अभिनेता संदीप पाठक यांची कामती खुर्द ग्रामपंचायतीस भेट; ग्रामस्थांमध्ये उत्साह

हास्यजत्रा फेम शिवाली परब आणि अभिनेता संदीप पाठक यांची कामती खुर्द ग्रामपंचायतीस भेट; ग्रामस्थांमध्ये उत्साह

मोहोळ (प्रतिनिधी ):- सोलापूर जिल्ह्यातील कामती खुर्द येथे हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब आणि लोकप्रिय अभिनेता संदीप पाठक यांनी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट दिली. या भेटीमुळे गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

भेटीदरम्यान दोन्ही कलाकारांनी गावातील शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. शाळेतील वर्गात बेंचवर बसून त्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. कलाकारांचा सहज, आपुलकीचा स्वभाव पाहून विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला.

यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना शिवाली परब आणि संदीप पाठक यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे महत्त्व सांगत या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. ग्रामीण विकास, स्वच्छता, शिक्षण आणि मूलभूत सुविधांच्या बळकटीसाठी ग्रामस्थांचा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, गटविकास अधिकारी विवेक जमदाडे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी विजयकुमार देशमुख, गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक, बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव, शिवराज राठोड, सरपंच सविता किरण माळी, उपसरपंच दीपक चंद्रकांत काटकर, दूध संघाचे व्हाईस चेअरमन दीपक दादा माळी, श्रीमती मंजुश्री मनोहर कारंडे तसेच ग्रामपंचायत अधिकारी, सदस्य व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भेटीमुळे कामती खुर्द ग्रामपंचायतीच्या विकास उपक्रमांना नवी ऊर्जा मिळाली असून, ग्रामस्थांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

 

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!