सोलापुरात पदयात्रेदरम्यान भाजप उमेदवार अनंत जाधवांना भोवळ; युनिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
सोलापुरात पदयात्रेदरम्यान भाजप उमेदवार अनंत जाधवांना भोवळ; युनिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात असताना प्रभाग क्रमांक ४ मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनंत जाधव यांना अचानक भोवळ आल्याची घटना घडली. ही घटना पदयात्रेदरम्यान घडल्याने काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली होती.

प्रभाग क्रमांक ४ मोठा असल्यामुळे मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी अनंत जाधव यांनी पदयात्रा काढली होती. मात्र, तीव्र उन्ह, सततची धावपळ आणि प्रचाराचा ताण यामुळे त्यांची तब्येत अचानक बिघडली. कार्यकर्त्यांच्या माहितीनुसार, शुगर कमी झाल्यामुळे त्यांना भोवळ आली.
घटनेनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना सोलापूरमधील युनिक युनिक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

या घटनेनंतर भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांनी रुग्णालयात गर्दी केली असून अनंत जाधव यांच्या प्रकृतीबाबत सतत चौकशी केली जात आहे. दरम्यान, अनंत जाधव लवकरच पूर्णपणे बरे होतील आणि प्रचारात पुन्हा सक्रिय होतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे आणि निवडणूक प्रचारातील वाढत्या धावपळीमुळे उमेदवारांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, अशी चर्चाही या घटनेनंतर नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.




