सोलापूर

सोलापूर जिल्हा परिषदेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा ; सीईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते ध्वजवंदन

सोलापूर जिल्हा परिषदेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा ; सीईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते ध्वजवंदन

सोलापूर (प्रतिनिधी):- भारत देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन सोलापूर जिल्हा परिषदेत मोठ्या उत्साहात व राष्ट्रभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रध्वजास मानवंदना देत ध्वजवंदन करण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रकांत जगताप, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायती) सूर्यकांत भुजबळ, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन जगताप, शिक्षणाधिकारी कादर शेख, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता सप्ताळे, गटविकास अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी हरीभाई देवकरण प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी राज्यगीत सादर करून उपस्थितांमध्ये राष्ट्राभिमानाची भावना जागृत केली. त्यानंतर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी उपस्थितांना कुष्ठरोग निर्मूलनाची शपथ दिली.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत संविधानातील मूल्ये प्रत्यक्ष आचरणात आणण्याचे आवाहन केले. यानंतर त्यांच्या व एका बालिकेच्या हस्ते हवेत तिरंगा रंगाचे फुगे सोडून प्रजासत्ताक दिनाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

त्यानंतर जिल्हा परिषद मुख्यालयात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वीय सहाय्यक सुधाकर माने देशमुख, कक्ष अधिकारी अविनाश गोडसे तसेच कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेहताब शेख यांनी केले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!