सोलापूर

अक्कलकोट रोडवर भीषण अपघात; वीट गाडी कारवर आदळली, चालक गंभीर जखमी

अक्कलकोट रोडवर भीषण अपघात; वीट गाडी कारवर आदळली, चालक गंभीर जखमी

सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील संगमेश्वर नगर, मणिधारीसमोर आज दुपारच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. वीट गाडी चालकाचा अचानक तोल गेल्याने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक बसली. या धडकेनंतर वीट गाडी रस्त्यावरच पलटी झाली असून, परिसरात एकच खळबळ उडाली.

Oplus_16908288

या अपघातात वीट गाडी क्रमांक MH 46 AR 5705 ने कार क्रमांक MH 13 EC 8725 ला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका तीव्र होता की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कारमधील प्रवासी थोडक्यात बचावले असून, मोठी दुर्घटना टळली आहे.
अपघातात वीट गाडी चालक गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर काही काळ अक्कलकोट रोडवरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Oplus_16908288

दरम्यान, या परिसरात यापूर्वीही वारंवार अपघात घडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. वाहनांचा वेग, अरुंद रस्ता तसेच योग्य वाहतूक नियोजनाचा अभाव यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. भविष्यातील अपघात टाळण्यासाठी येथे उड्डाणपूल उभारावा किंवा तातडीने वाहतूक सुधारणा कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Oplus_16908288

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. अपघात पाहण्यासाठी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!