राज्यात वाळू गटांचा लिलाव ३१ डिसेंबरपर्यंत; घरकुलांसाठी १० टक्के वाळू राखीव – राज्यमंत्री योगेश कदम
राज्यात वाळू गटांचा लिलाव ३१ डिसेंबरपर्यंत; घरकुलांसाठी १० टक्के वाळू राखीव – राज्यमंत्री योगेश कदम
नागपूर (प्रतिनिधी) :- राज्यातील वाळू निर्गती धोरणानुसार वाळू गटांतील १० टक्के नैसर्गिक वाळू घरकुलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे, अशी माहिती महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत दिली.
त्यांनी सांगितले की, शासन कृत्रिम वाळूच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. वाळू गटांमधून पाच ब्रास वाळू घरकुलांसाठी मोफत दिली जाते.
राज्यातील सर्व वाळू गटांचा लिलाव ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सुरू आहे.
ज्या तालुक्यांमध्ये नैसर्गिक वाळू गट उपलब्ध नाहीत, त्या ठिकाणी नागरिकांनी संबंधित तहसीलदाराकडे अर्ज केल्यास ज्या भागात वाळू उपलब्ध आहे तेथून त्यांना वाळू मिळू शकते. ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यमंत्री कदम म्हणाले,
“नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर, घरकुलांना प्राधान्य आणि कृत्रिम वाळूचा पर्यायी वापर वाढवणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे.”



