Prabuddha Raj

Latest Marathi News

कट्टीमनी घराण्याचा सामाजिक वारसा आता राजकीय दिशा शोधतोय – शुभम कट्टीमनींच्या नावाने जेऊर गटात नव्या नेतृत्वाची चर्चा तेज

अक्कलकोट (प्रतिनिधी) :- अक्कलकोट तालुक्यात समाजकारण, शिक्षण आणि लोकहिताच्या कामातून ओळख निर्माण करणाऱ्या कट्टीमनी कुटुंबाचा वारसा आता पुढच्या पिढीकडे सरकत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. दिवंगत दलित मित्र हनमंतराव कट्टीमनी हे नाव म्हणजे जनतेचा आधार, प्रशासनासमोर हक्कासाठी लढा आणि शिक्षणातील आदर्श असा परिचय आजही अनेकांना प्रेरणा देतो.

नागणसूर, करजगी आणि जेऊर येथे शिक्षक म्हणून कार्य करताना त्यांनी शाळेसाठी आयुष्य झोकून दिले. विद्यार्थ्यांच्या भविष्याकरता दिवस-रात्र मेहनत, शिष्यवृत्ती मार्गदर्शन आणि संगीत क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले.

सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी समाजासाठी कार्य थांबवले नाही.
घरकुल, संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना, तसेच अनेक शासकीय योजनांचे लाभ मिळवून देताना ते सामान्य लोकांचे “विश्वासू माणूस” बनले. त्यामुळे अक्कलकोट तालुक्याच्या पंचक्रोशीत आजही त्यांचे नाव आदराने आणि भावनेने घेतले जाते.

त्यांचे अनेक विद्यार्थी आज अधिकारी, शिक्षक, पोलीस, अभियंता तसेच विविध पदांवर कार्यरत आहेत हेच त्यांच्या कार्याचे जिवंत स्मारक आहे.

त्याच परंपरेतून वाढलेले आणि B.E. Engineer पदवी घेतलेले त्यांचे नातू शुभम महांतेश्वर कट्टीमनी हे गेल्या काही दिवसांपासून राजकीय आणि सामाजिक चर्चेचे नवे केंद्रबिंदू ठरत आहेत.त्यांचे नाव जोरदार ऐकू येत आहे.

शुभम कट्टीमनी हे शांत, संयमी आणि लोकांशी जोडलेली संवादशैली असलेले युवक असून, स्वतःचे ध्येय सामाजिक बदल आणि ग्रामीण विकासाशी जोडले आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार “आजोबांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणे आणि दुर्लक्षित, उपेक्षित लोकांसाठी आवाज बनणे ही माझी जबाबदारी आहे. राजकारण हे सत्तेसाठी नाही, तर लोकसेवेचे साधन असावे.”

सध्या शुभम कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार याची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी काही पक्ष त्यांच्याशी संपर्कात असल्याची माहिती मिळते काही स्थानिक गट समर्थनाची तयारी दाखवत आहेत तर काही विरोधकांनी “त्यांच्या एन्ट्रीमुळे समीकरण बदलू शकतात” अशी चर्चा मागे पुढे सुरू केली आहे यातून एक गोष्ट स्पष्ट ,त्यांचे नाव आले आणि स्थानिक राजकारण हलू लागले.

शुभम कट्टीमनींच्या संभाव्य उमेदवारीमुळे तीन वर्गांमध्ये उत्साह दिसून येतो ..
युवक — विकास आणि रोजगाराबद्दल आशावादी,
शेतकरी — त्यांच्या प्रश्नांना आवाज मिळेल अशी अपेक्षा
वंचित व गरीब घटक — त्यांच्या आजोबांच्या कामामुळे विश्वास

कट्टीमनी कुटुंबाचा सामाजिक वारसा आता राजकीय स्वरूपात पुढे येण्याची चिन्हे स्पष्ट झाल्याने जेऊर गटातील आगामी निवडणुका अधिक रंगतदार आणि स्पर्धात्मक होणार हे निश्चित.

शुभम कट्टीमनी अधिकृत प्रवेश कधी आणि कुठे करणार  याची प्रतीक्षा आता संपूर्ण तालुक्याला लागली आहे.