क्राईम

लाचेसाठी ‘डील’ आणि केसात हात फिरवत सिग्नल — महिला पोलीस अंमलदार ₹२०,००० घेताना एसीबीच्या सापळ्यात अडकली!”

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) :- कायद्याची अंमलबजावणी करणारेच कायद्याचा भंग करत असल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आला आहे. दौलताबाद पोलिस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस अंमलदार लता बाळासाहेब दराडे (वय ३७) हिला ₹२०,००० ची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले.

ही कारवाई २७ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास गारखेडा येथील एमरॉल्ड सिटी भागात करण्यात आली.दौलताबाद परिसरातील एका विवाहित जोडप्यातील वादाच्या प्रकरणाचा तपास लता दराडे हिच्याकडे होता. पतीने पत्नी आणि तिच्या मित्राविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात दराडेने दोघांकडे प्रत्येकी ₹१०,००० अशी एकूण ₹२०,००० लाच मागितल्याचा आरोप आहे.

तक्रारदारांनी ही बाब तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कळवली. अधीक्षक माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचेची मागणी सत्य असल्याची खात्री करून सापळा रचण्यात आला.

Oplus_16908288

दोघांनी पुन्हा दराडेशी फोनवर बोलणी केली
प्रथम तिने त्यांना पोलिस ठाण्यात बोलावले
नंतर वेळ झाल्याने घरी येण्याचे सांगितले
एसीबीचे पथक तिच्या घराबाहेर सज्ज होते
दोघेही घरात गेले आणि पैसे दिल्यानंतर लगेचच महिलेने केसात हात फिरवत एसीबीला ठरलेला इशारा दिला केवळ २ मिनिटांत एसीबी पथक घरात दाखल झाले आणि दराडेला लाच रकमेसह रंगेहाथ पकडले.

या कारवाईत खालील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते ,
अधीक्षक : प्रणाली माधुरी केदार-कांगणे
उपअधीक्षक : बाळासाहेब शिंदे

पथक सहभागी : संगिता पाटील, सुरेश नाईकनवरे, दीपक इंगळे, सचिन बारसे, रामेश्वर गोरे, सी.एन. बागूल लता दराडेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे. लाच मागणी, स्वीकार आणि विश्वासघाताच्या गंभीर गुन्ह्यांनुसार तिच्यावर निलंबनासह कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!