राजकारण

अक्कलकोटमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विराट सभा; विकासाचा हिशोब जनतेसमोर

अक्कलकोटमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विराट सभा; विकासाचा हिशोब जनतेसमोर

अक्कलकोट (प्रबुध्द राज न्युज) :-
अक्कलकोटमध्ये शिवसेनेच्या वतीने आयोजित विराट जनसभेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित करताना आगामी नगरपरिषद निवडणुकीत अक्कलकोट आणि दुधनीमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकेल असा ठाम विश्वास व्यक्त केला.

प्रचंड प्रमाणात उपस्थित जनसमुदायाने घोषणाबाजी करत शिंदे यांचे स्वागत केले.या सभेत शिंदे यांनी अक्कलकोटचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रईसशेठ टीनवाला व दुधनीसाठी प्रथमेश म्हेत्रे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

मंचावरून बोलताना शिंदे म्हणाले: “मुख्यमंत्रीपदाच्या काळात अक्कलकोटच्या ३८२ कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली.”त्यांनी सांगितले की शहरात सध्या ९ प्रमुख रस्त्यांचे काम सुरू आहे.यासोबतच खालील प्रकल्प राबविण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला:

नवीन वाहनतळ,वॉटर एटीएम सुविधा,शहर सुशोभिकरण,शौचालय,बांधकाम,व्यापारी,संकुल,भक्तनिवास,हत्ती तलाव उद्यान विकास प्रकल्प अक्कलकोटला येत्या काळात पाणीटंचाईपासून मुक्त करण्यासाठी ७२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

त्यासोबतच गटारव्यवस्था, पथदिवे, ड्रेनेज आणि स्वच्छता प्रकल्प सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.

शिंदे म्हणाले:
“अक्कलकोट हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. येथे लाखो भाविक येतात. त्यांना उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे, आणि ती निभावली जाईल.”

तसेच दुधनीसाठीही विकासनिधी देण्याचा शब्द त्यांनी दिला.
या सभेला माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख महेशनाना साठे, जिल्हाप्रमुख अमर पाटील, तसेच स्थानिक शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभा संपल्यानंतर परिसरात काही काळ घोषणाबाजी आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!