मंद्रुप पोलिसांचा अवैध ऑर्केस्ट्राबारवर छापा; १४ जणांवर गुन्हा दाखल
४ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; १० पुरुषांसह ४ महिलांचा समावेश

मंद्रुप पोलिसांचा अवैध ऑर्केस्ट्राबारवर छापा; १४ जणांवर गुन्हा दाखल
४ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; १० पुरुषांसह ४ महिलांचा समावेश
सोलापूर : मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोलापूर-विजापूर रोडवरील वडकबाळ गावाच्या शिवारात सुरू असलेल्या आम्रपाली ऑर्केस्ट्राबारवर मंद्रुप पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. विनापरवाना तसेच नियमांचे उल्लंघन करून ऑर्केस्ट्राबार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी १० पुरुष आणि ४ महिलांसह एकूण १४ जणांविरुद्ध मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांना ऑर्केस्ट्राबारबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने आम्रपाली ऑर्केस्ट्राबारवर छापा टाकला. या कारवाईत ऑर्केस्ट्राबारमधील साहित्य, मोटारसायकल आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ८२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
• १४ जणांविरुद्ध गुन्हा •
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३१/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेतील कलम २९६, ३(५) व इतर संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणातील आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत
1. सुप्रिया कुमार मोदल (वय १९), रा. सुभाष पाली, बारासात, नॉर्थ २४ परगणा, पश्चिम बंगाल.
2. नेहा सिंकदर मलीक (वय २४), रा. ९४, टालीगंज रोड, कोलकाता, पश्चिम बंगाल.
3. राक्षी दिपककुमार संधा (वय २०), रा. कैतुका नंदन बरण, बिहार; सध्या सोरेगाव, ता. उत्तर सोलापूर.
4. रूबी किशोरी पटेल (वय २३), रा. नरकटीया, पूर्वी चंपारण, बिहार; सध्या सोरेगाव, ता. उत्तर सोलापूर.
5. मनोज माधव पाटील, रा. प्लॉट नंबर ९१, पापारामनगर, विजापूर रोड, सोलापूर.
6. अमर अशोक तोडकर (वय २५), रा. पंचशील नगर, इंडी, जि. विजापूर.
7. विरेश बसवराज शेटटर, रा. इंडी, जि. विजापूर, कर्नाटक.
8. परमानंद उदयकुमार पोतदार (वय २३), रा. गांधी चौक, इंडी, जि. विजापूर, कर्नाटक.
9. बसवराज शांताप्पा कुंटोजी (वय २१), रा. मार्केट यार्ड, इंडी, जि. विजापूर, कर्नाटक.
10. शांताप्पा साहेबांना हदगल (वय २८), रा. शांतेश्वर टेम्पल, विजापूर, कर्नाटक.
11. सोमय्या बसय्या मठपती (वय ३६), रा. बगले प्लॉट, इंडी, विजापूर, कर्नाटक.
12. महमंद हिदायातुला माशाळकर (वय ५०), रा. शापेट मेन रोड, विजापूर, कर्नाटक.
13. उमरफारूक अब्दुललतीफ बगली (वय ३६), रा. के. के. जियसजवळ, कासगीरी गल्ली, विजापूर, कर्नाटक.
14. रियाज हारून आवटे (वय २८), रा. मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर.
आम्रपाली ऑर्केस्ट्राबारमध्ये विनापरवाना व नियमबाह्य पद्धतीने व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये ऑर्केस्ट्राबारमधील साहित्य, मोटारसायकल आणि रोख रकमेचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कदम, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीराम आदलिंग, पोलीस हेड कॉन्स्टेबल उत्तम सासवे, पोलीस नाईक सिंकदर मुल्ला, पोलीस कॉन्स्टेबल अश्पाक मियावाले, पोलीस कॉन्स्टेबल बिरण्णा वाघमोडे, महिला पोलीस अंमलदार पूजा काळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल विद्या कांबळे आणि चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल नानासाहेब अवघडे यांनी सहभाग घेतला.
मंद्रुप पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर परिसरातील विनापरवाना अथवा नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या आस्थापनांवर पुढील काळातही कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



