सोलापूर

आषाढी वारीतील उत्कृष्ट नियोजनाबद्दल उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा सन्मान

वारकरी सेवेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल; सदगुरू धोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फडाच्या वतीने गौरव

आषाढी वारीतील उत्कृष्ट नियोजनाबद्दल उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा सन्मान

वारकरी सेवेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल; सदगुरू धोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फडाच्या वतीने गौरव

सोलापूर : आषाढी वारी २०२६ या भव्य भक्तिसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुकर वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद, सोलापूरच्या वतीने विविध उपाययोजना आणि नियोजन करण्यात आले. या नियोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत वारकरी भाविकांच्या सुविधा, बांधकामाशी संबंधित कामे तसेच आवश्यक पायाभूत सुविधांकडे विशेष लक्ष दिल्याबद्दल जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा बांधकाम विभागाचे सभापती इंद्रजीत पवार यांचा सद्गुरू धोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फड, पंढरपूर यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

वारीच्या काळात वारकरी भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून विविध ठिकाणी स्वच्छता, पाणीपुरवठा, निवास व्यवस्था, रस्ते व इतर मूलभूत सुविधांचे नियोजन करण्यात आले. या संपूर्ण व्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.

वारकरी संप्रदायाच्या वतीने झालेला हा सत्कार स्वीकारताना इंद्रजीत पवार यांनी सद्गुरू धोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फडाचे मनःपूर्वक आभार मानले. हा सन्मान केवळ वैयक्तिक गौरव नसून वारकरी सेवा आणि समाजसेवेच्या कार्याला मिळालेली प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले.

वारी ही महाराष्ट्राच्या भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. पंढरीच्या वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित आणि चांगल्या सुविधा मिळणे ही प्रशासनाची तसेच लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. या भावनेतून भविष्यातही वारकरी भाविकांच्या सेवेसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प पवार यांनी व्यक्त केला.

“वारकरी सेवा हीच विठ्ठल सेवा,” या भावनेतून केलेल्या कार्याची दखल घेत झालेला हा सन्मान जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या कार्याला प्रोत्साहन देणारा ठरला आहे. वारकरी सेवा, विठ्ठल भक्ती आणि समाजसेवेच्या माध्यमातून जनतेशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

“सेवेतून समाधान आणि सेवेतूनच विठ्ठलाचा आशीर्वाद,” या भावनेतून पुढील काळातही वारकरी भाविकांच्या सुख-सुविधांसाठी सदैव प्रयत्नशील राहण्याची ग्वाही पवार यांनी दिली.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!