सोलापूर

सैनिकी मुलींच्या वसतिगृहात स्वयंपाकी पदाची भरती

सैनिकी मुलींच्या वसतिगृहात स्वयंपाकी पदाची भरती

सोलापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांच्या अधिपत्याखालील सैनिकी मुलींचे वसतिगृह, सोलापूर येथे अशासकीय स्वयंपाकीचे एक पद भरावयाचे आहे. या पदासाठी दरमहा 14 हजार 106 रुपये मानधन देण्यात येणार आहे.

स्वयंपाकी पदासाठी माजी सैनिक तसेच माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना प्राधान्य देण्यात येणार आहे. स्वयंपाकी म्हणून कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य राहील. माजी सैनिक किंवा माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांच्यापैकी पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास नागरी जीवनातील पात्र उमेदवारांचाही विचार करण्यात येणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पात्र माजी सैनिक तसेच माजी सैनिकांच्या विधवा पत्नींनी सैनिक सेवेची कागदपत्रे तसेच इतर शैक्षणिक कागदपत्रे दि. 24 ऑगस्ट 2026 पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे जमा करावीत. पात्र उमेदवारांच्या मुलाखती दि. 24 ऑगस्ट 2026 रोजी घेण्यात येणार आहेत.

उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहताना सर्व मूळ कागदपत्रे तसेच वैद्यकीय तपासणी अहवाल सोबत आणावा. सोलापूर जिल्ह्यातील पात्र व इच्छुक माजी सैनिक तसेच माजी सैनिकांच्या विधवा पत्नींनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
00000

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!