सोलापूर

जिद्द, सातत्य आणि सकारात्मक विचारांनी यशाचा मार्ग नक्की सापडतो – सागर कल्याणशेट्टी

हालहळ्ळी (अ) येथे गुणवंतांचा भव्य सत्कार; UPSC, MPSC सह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव

जिद्द, सातत्य आणि सकारात्मक विचारांनी यशाचा मार्ग नक्की सापडतो – सागर कल्याणशेट्टी

हालहळ्ळी (अ) येथे गुणवंतांचा भव्य सत्कार; UPSC, MPSC सह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव

अक्कलकोट :- अपयश हे शेवट नसून नव्या प्रयत्नांची सुरुवात असते. प्रत्येक चूक आपल्याला काहीतरी शिकवते आणि प्रत्येक अडचण आपल्याला अधिक सक्षम बनवते. नियमित अभ्यास, वेळेचे नियोजन आणि सकारात्मक विचाराच्या जोरावरच कोणतेही ध्येय सहज साध्य करता येत असल्याचे मत अक्कलकोट पंचायत समितीचे उपसभापती सागर कल्याणशेट्टी यांनी येते बोलताना व्यक्त केले.

अक्कलकोट तालुक्यातील हालहळ्ळी (अ ) येथे उज्ज्वल यश संपादन केलेल्या सत्कारमुर्तींचा सन्मान सोहळा ग्रामपंचायत व समस्थ ग्रामस्थ हालहळ्ळी (अ) यांच्या वतीने भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना उपसभापती सागर कल्याणशेट्टी हे बोलत होते.

यावेळी मातोश्री सरस्वती बाबुराव चाकोते विद्यालय सोलापूर येथे प्रशालेचे मुख्याध्यापकपदी मारूती बिराजदार यांचा निवड झाल्याबद्दल आणी ज्यांनी स्वतःच व आपल्या हालहळ्ळी अ गावाचे नाव आज देशाच्या नकाशावर सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. अशा या मातीतील सुपूत्र प्रविण स्वामी यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या(UPSC)परीक्षेत अखिल भारतीय २७९ वा क्रमांक पटकावून आयपीएस अधिकारी होण्याचा मान मिळविला आहे.व UPSC CAPF (सहाय्यक कमांडंट) या पदावर प्रवीण स्वामींनी विराजमान झाल्याने त्यांच्या सत्कार करण्यात आला. व शिलवंती राजमाने ह्यांनी MPSC परिक्षेत पास होऊन जलसंधारण अधिकारी पदावर विराजमान झाले व जिल्हा सत्र न्यायालयात लिपीकपदी सचिन ढब्बे यांचा निवड झाल्याबद्दल तर पुणे कारागृहात पोलिसपदी
संगिता वळदड्डे आणी म.रा.प.म चालक तथा वाहक म्हणून राहुल रसनभैरे यांचा निवड झाल्याबद्दल अक्कलकोट पंचायत समितीचे उपसभापती सागर कल्याणशेट्टी व मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्या विमल गव्हाणे,निवृत्त ज्येष्ठ शिक्षिका सुभद्राबाई अकतनाळ,चपळगावचे सरपंच वर्षा भंडारकवठे, समाजसेवक सिध्दाराम भंडारकवठे,किणीचे उपसरपंच तथा भाजपा मंडल अध्यक्ष अमोल हिप्परगे, हालहळ्ळी(अ) चे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य निलप्पा बिराजदार, ग्रामसेविका सुरेखा सरवळे, निवृत्त ग्रामविकास अधिकारी श्रीशैल स्वामी,शिवनिंगप्पा वंगे,निवृत्त प्राध्यापक तथा श्री रामलिंगेश्वर प्रशाला, तीर्थचे चेअरमन डॉ.भिमाशंकर बिराजदार,माजी सरपंच विश्वनाथ दोड्याळे, पोलिस पाटील मल्लिकार्जुन बिराजदार,इंजिनिअर शशिकांत स्वामी,डॉक्टर मल्लिनाथ स्वामी आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना उपसभापती सागर कल्याणशेट्टी म्हणाले की, जीवनात कितीही अडथळे आले तरी प्रयत्न सोडू नयेत. कारण सातत्याने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना यश एक ना एक दिवस नक्कीच मिळत असल्याचे सांगितले. यावेळी सत्कारमूर्ती प्रविण स्वामी, मारुती बिराजदार, शिलवंती राजमाने,सचिन ढब्बे यांनी या पदापर्यंत पोहोचताना काय काय अनंत अडचणी आल्या ते मनोगतातून व्यक्त केले.व आपल्या गावचा ऋणी कायम हृदयात असणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी सुभद्राबाई अकतनाळ, सिध्दाराम भंडारकवठे, अमोल हिपरगे, भिमाशंकर बिराजदार,शंभुलिंग अकतनाळ आदींनी आपले विचार मांडले. यावेळी हालहळ्ळी अ ग्रामपंचायत च्या वतीने गावातील काही विविध अडचणी संदर्भात उपसभापती सागर कल्याणशेट्टी यांना ग्रामपंचायतीच्या वतीने कामाच्या मागणीचे लेखी निवेदन देण्यात आले.

या कार्यक्रमास मार्डी महात्मा फुले प्रशालेचे पर्यवेक्षक गंगाधर राजमाने, सुभाष ढब्बे, चंद्रकांत स्वामी, यशवंत इंगळे, शंभुलिंग अकतनाळ, वीरेश कोन्हाळे, गुरुनाथ गोविंदे, राजकुमार बिराजदार, गंगाधर वळदड्डे, अनिल स्वामी, श्रीशैल बिराजदार, रामण्णा बोराळे,भोजराया पाटील, सिध्दाराम बिराजदार,नागय्या स्वामी,भुजय्या स्वामी, बसवराज बन्ने गुरुजी, स्वामीनाथ परशेट्टी, बापूराव गोविंदे , गौरीशंकर दोड्याळे,रमेश परशेट्टी, महंमद नदाफ यांच्या सह हालहळ्ळी(अ), चपळगाववाडी, चपळगाव, तीर्थ ,कर्जाळ, कोन्हाळी,सोलापूर यासह आदी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त हालहळ्ळी(अ) करांनी परिश्रम घेतले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!