सोलापूर

सोलापूर जिल्हा परिषदेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत ध्वजारोहण

अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या हस्ते ध्वजारोहण; अधिकारी-कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती

सोलापूर जिल्हा परिषदेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत ध्वजारोहण

अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या हस्ते ध्वजारोहण; अधिकारी-कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती

सोलापूर :- महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा स्मृतिदिन असलेला १ मे महाराष्ट्र दिन सोलापूर जिल्हा परिषदेत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात आयोजित या कार्यक्रमात देशभक्तीचा उत्साह आणि राज्याभिमानाचे दर्शन घडले.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अॅड. अमृता वाघे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

यानंतर अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रभक्तीची भावना व्यक्त केली.

या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, अतिरिक्त मुख्य लेखा व वित्त अधिकारी उबाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र दिनानिमित्त उपस्थित मान्यवरांनी राज्याच्या विकासासाठी प्रशासनाने अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज व्यक्त केली. ग्रामीण भागातील विकासकामांना गती देत शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. संपूर्ण परिसर देशभक्तीपर वातावरणाने भारावून गेला होता.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!