महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला तिरंगात उजळली जिल्हा परिषद; चंद्रोदयाने साधला अनोखा योग
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला तिरंगात उजळली जिल्हा परिषद; चंद्रोदयाने साधला अनोखा योग
सोलापूर :- महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषद इमारत आकर्षक तिरंगा लाईटिंगमध्ये उजळून निघाली असून परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे. इमारतीवर केशरी, पांढरा आणि हिरवा अशा तीन रंगांची रोषणाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सूर्यास्ताच्या सुमारास उद्याच्या बुद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर चंद्रोदय होताना दिसला आणि या दृश्याने एक अनोखा योग साधला.
एकीकडे तिरंग्यात नटलेली भव्य जिल्हा परिषद इमारत आणि दुसरीकडे हळूहळू उगवणारा चंद्र यामुळे परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले गेले. या दुर्मिळ आणि मनमोहक दृश्याचा अनुभव घेण्यासाठी अनेकांनी थांबून छायाचित्रे व व्हिडिओ टिपले.
राष्ट्रीय अभिमान आणि निसर्गाची सुंदर साथ अशा या योगायोगामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, हा क्षण अनेकांसाठी अविस्मरणीय ठरत आहे.




