सोलापूर

सोलापुरात सामाजिक समता सप्ताहाची सुरुवात; विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन

समता, न्याय व बंधुतेचा संदेश देणारा सप्ताह; ८ ते १४ एप्रिलदरम्यान उपक्रमांची मालिका

सोलापूर (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. समाजकल्याण आयुक्तालयाच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्हा समाजकल्याण कार्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समाज कल्याण च्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुलोचना सोनवणे यांनी दिली.

सामाजिक समता सप्ताह ८ एप्रिल – १४ एप्रिल २०२६ या कालावधीत खालील प्रमाणे साजरा होणार….

* ८ एप्रिल २०२६ –
उद्घाटन कार्यक्रम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, सोलापूर येथे.
– पत्रकार परिषद : सामाजिक समता सप्ताहातील उपक्रमांची माहिती जाहीर.
“सदर कार्यक्रमामध्ये सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन करण्यात येणार असून त्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार आहे.”

* ९ एप्रिल २०२६
– महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतिगृहांमध्ये व्याख्यान, वक्तृत्व, निबंध व लघुनाट्य स्पर्धा.
– महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त मानवी हक्कांवर विशेष कार्यक्रम.
– संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त व्याख्याने व स्पर्धा.
– विभागीय स्तरावर योजनांचा लाभ वाटप.

* १० एप्रिल २०२६
– ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघुनाटिका द्वारे जनजागृती.
– मार्जिन मनी योजनेंतर्गत कार्यशाळा व लाभार्थ्यांचा मेळावा.

* ११ एप्रिल २०२६
– महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती उत्सव.
– जेष्ठ नागरिक जनजागृती शिबीर व मेळावा.
शाळा-महाविद्यालयांमध्ये रक्तदान शिबिर.
– स्वच्छता अभियान व जात पडताळणी कार्यालयात Online-Validity प्रमाणपत्र वितरण.

* १२ एप्रिल २०२६
– संविधान जागर कार्यक्रम : संविधान निर्मिती, अनुच्छेद, अधिकार व कर्तव्यांवर व्याख्यान.
– महिला मेळावा : आंबेडकरांनी महिलांसाठी केलेल्या कार्यावर विशेष व्याख्यान.

* १३ एप्रिल २०२६
– जेष्ठ नागरिक जनजागृती शिबीर व मेळावा.
– रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान.
– जात पडताळणी कार्यालयात Online-Validity प्रमाणपत्र वितरण.

* १४ एप्रिल २०२६
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रम.
– व्याख्यान, चर्चासत्र व लोकप्रतिनिधींना निमंत्रण.
– दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा.
– महाडच्या चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त व्याख्यान.
– सामाजिक समता सप्ताहाचा समारोप.

या कार्यक्रमांमधून संविधानातील समता, न्याय व बंधुता या मूल्यांची जनजागृती होणार असून अनुसूचित जाती-जमाती व वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होणार आहे.

तरी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सामाजिक समता सप्ताहात सहभागी व्हावे, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!