सोलापूर
गॅस पुरवठ्याबाबत प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांचे जनतेला महत्त्वाचे आवाहन
सर्व्हर डाऊनमुळे गॅस बुकिंगमध्ये अडथळा; नागरिकांनी घाबरू नये
गॅस पुरवठ्याबाबत प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांचे जनतेला महत्त्वाचे आवाहन
सर्व्हर डाऊनमुळे गॅस बुकिंगमध्ये अडथळा; नागरिकांनी घाबरू नये
सोलापूर (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यातील अनेक गॅस एजन्सींमध्ये सकाळपासून गॅस सिलेंडर बुकिंग होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. याबाबत प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी नागरिकांना घाबरू नये, असे आवाहन केले आहे.
जिल्ह्यात एकूण ९४ गॅस एजन्सी कार्यरत असून, तांत्रिक कारणामुळे सर्व्हर डाऊन झाल्याने बुकिंग प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्याची माहिती त्यांनी दिली. प्रशासनाने या संदर्भात गॅस एजन्सी संचालकांशी चर्चा केली आहे.
दरम्यान, नागरिकांनी घाईगडबड न करता प्रशासनाला सहकार्य करावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही कुलदीप जंगम यांनी केले आहे.
दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा
संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर
9503822387



