सोलापूर

सोलापूरचे माजी महापौर यांचे निधन; शहरात शोककळा

सोलापूरचे माजी महापौर यांचे निधन; शहरात शोककळा

सोलापूर (प्रतिनिधी) : सोलापूरचे माजी महापौर तथा पद्मशाली ज्ञाती संस्थेचे विश्वस्त जनार्दन यल्लय्या कारमपुरी यांचे रविवार, दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९.३० वाजता दुःखद निधन झाले. मृत्युसमयी ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय व पद्मशाली समाजात शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी दुर्गाबाई तसेच दत्तात्रय, दयानंद आणि प्रवीण अशी तीन मुले असा परिवार आहे.

त्यांची अंत्ययात्रा सोमवार, दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता शेळगी येथील जयलक्ष्मी सोसायटीतील त्यांच्या राहत्या निवासस्थानापासून निघणार असून, अक्कलकोट रोडवरील पाणी टाकी जवळील पद्मशाली समाजाच्या शांतीधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जनार्दन कारमपुरी यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात महापौर म्हणून शहराच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले. पद्मशाली समाजाच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. नुकत्याच पार पडलेल्या पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने आयोजित नूतन नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्यासही ते आवर्जून उपस्थित राहिले होते.

तसेच शारदा मिलच्या उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान राहिले असून औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला होता.
त्यांच्या निधनाने सोलापूर शहराने एक ज्येष्ठ, अनुभवी व समाजाभिमुख नेतृत्व गमावले आहे.

शहरातील विविध राजकीय, सामाजिक संस्था व मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!