महाराष्ट्र पोलिसांचा मान वाढवणारी कामगिरी; हवालदार भागवत शिंदे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

महाराष्ट्र पोलिसांचा मान वाढवणारी कामगिरी; हवालदार भागवत शिंदे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
सोलापूर (प्रतिनिधी):- महाराष्ट्र पोलीस दलासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी कामगिरी पोलीस हवालदार भागवत शिंदे यांनी केली आहे. ७ ते ८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान तेलंगणा राज्यातील करीमनगर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेसाठी त्यांची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

या स्पर्धेत भागवत शिंदे हे महाराष्ट्र पोलीस दल तसेच महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. सध्या ते पोलीस दलात हवालदार पदावर कार्यरत असून, क्रीडा क्षेत्रात त्यांनी सातत्याने केलेल्या मेहनतीमुळे त्यांना ही संधी मिळाली आहे.

राष्ट्रीय स्तरावर निवड होणे ही मोठी उपलब्धी मानली जाते. त्यांच्या या निवडीमुळे महाराष्ट्र पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पोलीस दलातील सहकारी, अधिकारी तसेच विविध स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
भागवत शिंदे यांच्या या यशामुळे युवा पिढीला प्रेरणा मिळणार असून, राज्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




