सोलापूर

मतदान – मतमोजणीदिवशी कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक पाऊल; तालुकानिहाय बाजार बंदीची यादी जाहीर

मतदान – मतमोजणीदिवशी कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक पाऊल; तालुकानिहाय बाजार बंदीची यादी जाहीर

सोलापूर (प्रतिनिधी):- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक–२०२६ च्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मा. राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक १३ जानेवारी २०२६ च्या पत्रान्वये निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली असून मतदान व मतमोजणी प्रक्रिया निर्भय, निष्पक्ष व शांततेत पार पडावी यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्या अनुषंगाने प्र. जिल्हादंडाधिकारी गणेश नि-हाळी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(३) तसेच मार्केट अॅण्ड फेअर अॅक्ट १८६२ मधील कलम ५(ग) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून आदेश जारी केला आहे.
सदर आदेशानुसार सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मतदान दिनांक शनिवार, ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी तसेच मतमोजणी दिनांक सोमवार, ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी संबंधित गावांमध्ये आठवडा बाजार भरविण्यास मनाई करण्यात आली आहे.

*मतदान दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी बंद राहणारे आठवडा बाजार (शनिवार)*

*उत्तर सोलापूर तालुका*
मौजे कळमण
मौजे पाकणी

*मोहोळ तालुका*
मौजे सयद परवडे
मौजे पापरी
मौजे हिवरे
मौजे देवडी

*दक्षिण सोलापूर तालुका*
मौजे कंदलगाव
मौजे औज
मौजे मंद्रुप
मौजे बरूर
मौजे होटगी

*बार्शी तालुका*
बार्शी शहर
मौजे बावी
मौजे ममदापूर
मौजे घारी

*करमाळा तालुका*
मौजे केत्तूर नं. २
मौजे चिकलठाण नं. १
माढा तालुका
मौजे टाकळी टे
मौजे मोडनिंब

*सांगोला तालुका*
मौजे गौडवाडी
मौजे आलेगाव
मौजे वाटंबरे
मौजे पाचेगाव खुर्द
मौजे मानेगाव
मौजे तावशी

*पंढरपूर तालुका*
मौजे पुळूशी
मौजे उंबरे मगरवाडी
मौजे खरसोळी
मौजे उंबरगाव
मौजे भंडीशेगाव
मौजे बोहाळी
माळशिरस तालुका
मौजे वेळापूर

*अक्कलकोट तालुका*
मौजे शिरवळ
मौजे चपळगाव
मौजे कर्जाळ
मौजे जेऊर

*मतमोजणी दिनांक ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी बंद राहणारे आठवडा बाजार (सोमवार)*

*अक्कलकोट तालुका*
अक्कलकोट

*मंगळवेढा तालुका*
मंगळवेढा

प्रशासनाने संबंधित गावांतील नागरिक, व्यापारी व बाजार समित्यांनी आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व आवश्यक उपाययोजना केल्या असल्याचे प्र. जिल्हादंडाधिकारी गणेश नि-हाळी यांनी कळविले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!