सोलापूर

दै. लोकसत्ताचे ज्येष्ठ प्रतिनिधी एजाजहुसेन मुजावर यांचं अल्पशा आजाराने निधन

सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकार आणि दै. लोकसत्ताचे प्रतिनिधी एजाजहुसेन मुजावर (वय ५९) यांचे अल्पशा आजाराने आज गुरुवारी सकाळी निधन झाले. गेली काही महिने प्रकृती अस्वास्थ्याचा सामना करत असलेल्या मुजावर यांची प्राणज्योत आज सकाळी ९.१५ वाजता सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात मालवली. त्यांच्या निधनाने सोलापूरच्या पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

आज सायंकाळी ६ वाजता उत्तर कसबा येथील थोरला मंगळवेढा तालीम परिसरातील त्यांच्या राहत्या घरातून पार्थिवाला अंतिम निरोप देण्यात येणार असून दफनविधी जडेसाब कब्रस्तान, अक्कलकोट रोड येथे पार पडणार आहे.

 

एजाजहुसेन मुजावर हे सोलापुरातील अभ्यासू, व्यासंगी आणि निस्पृह पत्रकार म्हणून व्यापक परिचित होते. त्यांच्या पत्रकारितेच्या वाटचालीची सुरुवात संचारपासून झाली. सुप्रसिद्ध संपादक स्व. रंगाअण्णा वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पत्रकारितेची भक्कम पायाभरणी केली.

शहर- जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, प्रशासकीय घडामोडींची त्यांची पकड इतकी मजबूत होती की “सोलापूरचा संदर्भ ग्रंथ” म्हणून ते ओळखले जात. जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते त्यांच्याकडून सल्ला घेत असत, तर नवोदित पत्रकारांसाठी ते प्रेरणास्थान होते.

निरपेक्षता, धाडस, आणि सत्यनिष्ठ लेखनशैली हे त्यांच्या पत्रकारितेचे वैशिष्ट्य. लोकसत्ताचे दीर्घकाळ प्रतिनिधी म्हणून त्यांनी जनहिताशी बांधिलकी जपत अनेक महत्त्वाच्या बातम्या उघडकीस आणल्या.

अचानक गंभीर प्रकृती बिघडली तीन महिन्यांपूर्वी त्यांना विस्मृतीचा त्रास जाणवू लागला. वैद्यकीय तपासणीत मेंदूत गाठ असल्याचे निष्पन्न झाले. तत्काळ त्यांच्यावर मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचारानंतर थोडी सुधारणा झाली; परंतु मागील आठवड्यापासून पुन्हा त्रास वाढला. आज सकाळी त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.
उरला मागे परिवार – आणि एक अमूल्य वारसा
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि मुलगा असा परिवार आहे.

त्यांचा जाणे म्हणजे सोलापूरच्या पत्रकारितेचा एक आधारस्तंभ कोसळल्यासारखे आहे.
ज्या थाटात त्यांनी तीन दशकांपेक्षा अधिक काळ सत्यनिष्ठ, तटस्थ, परिपूर्ण आणि समाजकेंद्री पत्रकारिता केली, त्यांचे कार्य दीर्घकाळ स्मरणात राहील.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!