महाराष्ट्र

पानटपरीवाल्यांनो सावधान ! गुटखा विकला तर थेट ‘मोक्का’; झिरवाळांचा कठोर इशारा

नाशिक (प्रबुध्द राज न्युज):- राज्यात अवैध गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला, खर्रा-मावा यांच्या वाढत्या विक्रीवर अखेर सरकारने मोठा दणका देण्याचे ठरवले आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी थेट ‘मोक्का’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लावण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, यामुळे गुटखा माफियांची पुरती दमछाक होणार आहे.

मंत्रालयात नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गुटखा रॅकेटचे धागेदोरे परराज्यांपर्यंत असून, त्यात काही शासकीय अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले.

Oplus_16908288

“या भ्रष्ट मंडळींना मी अजिबात सोडणार नाही. शासकीय अधिकारी गुन्ह्यात सापडले तर थेट निलंबन,” असा इशारा झिरवाळ यांनी दिला.

मंत्री झिरवाळ यांनी एका धक्कादायक वास्तवाची माहिती दिली- जाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाला सुपारीचा आकार देणे ,त्यावर रंग-केमिकल लावणे आणि नंतर बाजारात सुगंधित गुटखा म्हणून विक्री हा उद्योग तरुणांच्या आरोग्याशी उघडपणे खेळ करणारा गंभीर गुन्हा आहे, असे मंत्री म्हणाले.
गुटखा सेवनामुळे नपुंसकत्व, कर्करोग आणि इतर भयानक आजार वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Oplus_16908288

मुख्य सूत्रधार, उत्पादक व विक्रेत्यांवर थेट ‘मोक्का’,
दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन आणि विभागीय चौकशी,पोलिस, अन्न व औषध प्रशासन आणि शिक्षण विभागाची संयुक्त धाडमोहीम शाळा-कॉलेजांमध्ये जनजागृती मोहीम,गुटखा तस्करी रोखण्यासाठी सीमांवर विशेष पथके गुटखा तस्करांमध्ये आणि अवैध विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर धाडी, जप्ती, अटक मोहीम सुरू होणार असून, गुटखा माफियांची कंबर मोडण्याचा सरकारचा निर्धार स्पष्ट दिसत आहे.

“गुटखाबंदी कागदावर नव्हे, तर प्रत्यक्ष अंमलबजावणीत दिसली पाहिजे,” — नरहरी झिरवाळ.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!