बुलडोजर बाबा”ची धमाकेदार पुनरागमन एन्ट्री; विमानतळ परिसरातील अतिक्रमणावर थेट जेसीबी!
- “बुलडोजर बाबा”ची धमाकेदार पुनरागमन एन्ट्री; विमानतळ परिसरातील अतिक्रमणावर थेट जेसीबी!
सोलापूर (प्रतिनीधी):-
सोलापूर शहरातील अतिक्रमणविरोधी कारवाईला आज पुन्हा एकदा वेग आला, तोही थेट “बुलडोजर बाबा” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंध विभागाचे माजी अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांच्या पुनरागमनामुळे. सेवानिवृत्तीनंतर ताज्या नियुक्तीनंतर बनसोडे यांनी पहिली कारवाई कोणत्या ठिकाणी करायची याठिकाणी कोणतीही शंका नव्हती पण

होटगी रोड–विमानतळ परिसरातील अनेक दुकानदारांना आणि व्यवसायिकांना,नोटिसा देण्यात आल्या,अतिक्रमण हटवण्यासाठी वेळ देण्यात आला,
वारंवार सूचनाही करण्यात आल्या…तरीही अनेकांनी अतिक्रमण हटवले नाही. त्यामुळे आज जेसीबीसह धडक कारवाई करण्यात आली.

यावेळी अनाधिकृत बांधकामे व शेड पाडण्यात आली,
यामध्ये हॉटेलांचे खोके,अनधिकृत दवाखाने,मटण चिकन दुकाने,गॅरेजेसची शेड,फूटपाथ व रस्त्यावर उभे केलेले अनधिकृत स्टॉल काही ठिकाणाहून साहित्य जप्तही करण्यात आले.
कारवाईदरम्यान तणाव, पण बनसोडे ठाम
काही व्यवसायिकांनी रडवेला सूर लावत
“आमचा उदरनिर्वाह कसा चालणार?”
असा सवाल करत रोष व्यक्त केला. मात्र बनसोडे यांनी एकही इंच मागे हटण्यास नकार देत स्पष्ट भूमिका मांडली —

“नोटिसा दिल्या, वेळ दिला… आता कायदा आपलं काम करेल!”
ही मोहीम महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या निर्देशानुसार राबवण्यात आली. कारवाई पूर्ण झाल्यानंतर विमानतळ परिसरात रस्ते मोकळे झाले असून वाहतुकीस मोठा दिलासा मिळाल्याचे नागरिकांनी सांगितले.

शहरात चर्चा – ‘बुलडोजर बाबा परतले!’
सोलापूर शहरात आजची कारवाई म्हणजे उत्सुकता + भीती + सुटकेचा नि:श्वास यांचा संगमच दिसला.
नागरिक म्हणाले—
“खूप दिवसांपासून त्रास होता… आता बरं वाटतंय.”
“बनसोडे सर परत आले की माहितीये… अतिक्रमणाची खैर नाही!”
शहर स्वच्छ-सुंदर करण्याकडे मोठे पाऊल

आजची धडक मोहीम पाहता स्पष्ट झाले—
“बुलडोजर बाबा” परतलेत आणि शहर पुन्हा स्वच्छ, सुंदर आणि अडथळामुक्त करण्याची मोहीम वेगाने सुरू आहे.



