सोलापूर ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल; १३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश
आस्थापना मंडळाच्या बैठकीनंतर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे आदेश; तात्काळ नवीन ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश

सोलापूर ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल; १३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश
आस्थापना मंडळाच्या बैठकीनंतर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे आदेश; तात्काळ नवीन ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश
सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने १३ पोलीस अधिकारी व सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. २९ जून २०२६ रोजी झालेल्या जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम २२(न)(२) अंतर्गत हे आदेश जारी करण्यात आले.
या बदल्यांमध्ये दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेले, पदोन्नतीने हजर झालेले तसेच विनंती बदली केलेल्या अधिकाऱ्यांचा समावेश असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या विनंत्यांचा विचार करून स्वखर्चाने बदली करण्यात आली आहे.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये पोलीस निरीक्षक अविनाश एकनाथ पवार यांची नियंत्रण कक्षातून अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात, कुंदन तुकाराम गावडे यांची वैराग पोलीस ठाण्यातून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात, दीपक ज्योतिराम पाटील यांची नियंत्रण कक्षातून मोहोळ पोलीस ठाण्यात, बाळू रसिक भरणे यांची वाहतूक शाखेतून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तसेच अमूल शंकर कादबने यांची नियंत्रण कक्षातून वैराग पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय, दशरथ भानुदास वाघमोडे यांची पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातून माळशिरस पोलीस ठाण्यात, तय्यब युनूस मुजावर यांची पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यातून पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात, सुरेश गणपतराव चिल्लावार यांची अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यातून पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात, विकास चन्नवीर दिंडुरे यांची माळशिरस पोलीस ठाण्यातून सायबर पोलीस ठाण्यात, तर दीपक लक्ष्मण बरडे यांची नियंत्रण कक्षातून जिल्हा वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.
तसेच कमलाकर नरसिंह गड्डीमे यांची नियंत्रण कक्षातून आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय आप्पासो सोनवणे यांना पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यातून बार्शी तालुका पोलीस ठाण्याचा प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश आण्णासाहेब कड यांची आर्थिक गुन्हे शाखेतून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
या सर्व अधिकाऱ्यांनी तात्काळ आपल्या नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी हजर होऊन अनुपालन अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे आदेश सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल व्ही. कुलकर्णी यांनी जारी केले आहेत.



