सोलापूर

राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांचा गौरव; आरोग्यसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल

डॉक्टर्स डे व सीए डे निमित्त आरोग्य व आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांचा १ जुलै रोजी सन्मान

राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांचा गौरव; आरोग्यसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल

डॉक्टर्स डे व सीए डे निमित्त आरोग्य व आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांचा १ जुलै रोजी सन्मान

सोलापूर : राष्ट्रीय डॉक्टर्स डे आणि सीए डेच्या निमित्ताने आरोग्य व आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि डी.एस.टी.एस. मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, १ जुलै रोजी शिवदारे कॉलेज, सोलापूर येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाच्या पुरस्कारासाठी सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) डॉ. सतीश कोपूरवाड यांची निवड विशेष लक्षवेधी ठरली आहे. यापूर्वी नांदेड जिल्ह्यात कार्यरत असताना डॉ. कोपूरवाड यांच्या नेतृत्वाखाली दि.07 डिसेंबर 2024 ते 24 मार्च 2025 या कालावधीत राबवण्यात आलेल्या ‘टी.बी. मुक्त भारत अभियान’मध्ये नांदेड जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला होता. तसेच वर्ष 2025 मध्ये भारत सरकारने सुनिश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार व निर्देशांकानुसार टी.बी. निर्मूलन कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याने राज्यात चौथा क्रमांक मिळवला होता. तसेच एप्रिल 2026 पासून सोलापूर जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी केलेले नियोजन, विविध आरोग्य मोहिमांची प्रभावी अंमलबजावणी, केलेले नियोजन, विविध आरोग्य मोहिमांची प्रभावी अंमलबजावणी, ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पोहोचविण्याचे प्रयत्न तसेच क्षयरुग्णांना फूड बास्केट वाटप, लसीकरण, माता-बाल आरोग्य आणि जनजागृती उपक्रमांमध्ये दिलेले नेतृत्व याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

डॉ. सतीश कोपुरवाड यांच्यासह जनरल फिजिशियन डॉ. राजेंद्र अग्रवाल, ईएनटी तज्ज्ञ डॉ. विद्याधर बोराडे, हृदयविकारतज्ज्ञ व शल्यचिकित्सक डॉ. रिझवान-उल-हक, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मीनल चिडगुपकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत गाडे तसेच ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट श्रीधर रिसबूड आणि सीए चंद्रकांत रच्चा यांचाही गौरव करण्यात येणार आहे.

या पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. विजय कानेटकर यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी.एस.टी.एस. मंडळ, सोलापूरचे राजशेखर शिवदारे असतील. विविध क्षेत्रातील मान्यवर, वैद्यकीय तज्ज्ञ, चार्टर्ड अकाउंटंट, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

दरवर्षी १ जुलै हा दिवस देशभरात राष्ट्रीय डॉक्टर्स डे तसेच सीए डे म्हणून साजरा केला जातो. समाजासाठी निस्वार्थपणे सेवा देणाऱ्या डॉक्टर आणि आर्थिक क्षेत्रातील व्यावसायिकांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आला असून, आयोजकांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!