महाराष्ट्र

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत आज राज्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत आज राज्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद

मुंबई (प्रतिनिधी):- राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण माहिती देण्यासाठी आज मंगळवार, दि. १३ जानेवारी २०२६ रोजी राज्य निवडणूक आयुक्त श्री. दिनेश वाघमारे पत्रकार परिषद घेणार आहेत.

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोटनुसार ही पत्रकार परिषद दुपारी ४.०० वाजता सह्याद्री अतिथिगृह, मलबार हिल, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.

या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या वेळापत्रकाबाबत, आरक्षण, निवडणूक प्रक्रिया तसेच आचारसंहितेसंदर्भातील महत्त्वाचे निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे राज्यातील राजकीय पक्षांसह प्रशासन व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे सहायक आयुक्त (जनसंपर्क) डॉ. जगदीश मोरे यांनी सर्व वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांच्या संपादकांना व प्रतिनिधींना या पत्रकार परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

आज होणाऱ्या या पत्रकार परिषदेमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!