सोलापूर

सलगरमध्ये शौचालय पुनर्विकासाला सुरुवात; महिलांसह नागरिकांना मोठा दिलासा

सलगरमध्ये शौचालय पुनर्विकासाला सुरुवात; महिलांसह नागरिकांना मोठा दिलासा

अक्कलकोट (प्रतिनिधी):- अक्कलकोट तालुक्यातील सलगर गावातील भिमनगर परिसरात दीर्घकाळापासून जीर्ण अवस्थेत असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या पुनर्विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला. या शौचालयाची अवस्था अत्यंत खराब असल्याने परिसरातील नागरिकांना, विशेषतः महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही गरज ओळखून अखेर शौचालय पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे.

भिमनगर येथील हे शौचालय अनेक वर्षांपासून दुरवस्थेत होते. स्वच्छता, सुरक्षितता आणि वापराच्या दृष्टीने ते अपुरे ठरत असल्याने नागरिकांकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. महिलांना विशेषतः सकाळ व संध्याकाळच्या वेळेत मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याने या कामाची मागणी तीव्र होती.

ग्रामपंचायत सदस्य अमोल पुटगे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून या शौचालयाच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाअंतर्गत दर्जेदार बांधकाम, स्वच्छतेची योग्य व्यवस्था तसेच नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे काम वेळेत आणि गुणवत्तापूर्ण होण्यासाठी सातत्याने लक्ष ठेवले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

शुभारंभ प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य परशुराम भगळे, सिद्धाराम धसाडे, चंद्रकांत निंगदळ्ळी, सागर धसाडे, अजय ईसामंत्री यांच्यासह परिसरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले असून, पुनर्विकास पूर्ण झाल्यानंतर परिसरातील स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक बदल घडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Oplus_16908288

या शौचालयाच्या पुनर्विकासामुळे सलगर भिमनगर परिसरातील महिलांसह सर्व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, सार्वजनिक सुविधा सुधारण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!